मुंबई । नगर सह्याद्री - अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्...
मुंबई । नगर सह्याद्री -
अब्दुल सत्तार सुप्रिया सुळेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झापले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सत्तारांना फोन करून त्यांनी कानउघाडणी केली आहे. माफी मागा, असे थेट आदेशही शिंदेंनी दिल्याचे समजते.
शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे गेल्या काही दिवसांपासून वादाच्या केंद्रस्थानी आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करताना गलिच्छ भाषेचा वापर त्यांच्याकडून केला जात असल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दलही त्यांनी अपशब्द वापरले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता होऊ लागली आहे.
त्याचवेळी मुंबईतील त्यांच्या घराच्या खिडक्यांच्या काचाही फोडल्याची घटना घडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर ठिय्या मांडला होता. दुसरीकडे औरंगाबादमधील घरावरही दगडफेक झाल्याचे वृत्त आहे.
सत्तार यांनी माफी मागावी, अन्यथा महाराष्ट्रभर त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा दिला जात आहे. याबाबत पोलीस ठाण्यांतही तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला जात असताना अनेकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर या प्रकरणाची दखल थेट मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांनी केलेल्या वक्तव्याची गंभीर दखल घेतली आहे. सत्तारांच्या वक्तव्यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सत्तारांना थेट फोन करून कान टोचले आहेत. वक्तव्यावर माफी मागा असे थेट आदेशच त्यांनी दिले आहेत. दरम्यान, सत्तारांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंनी तात्काळ पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
COMMENTS