मुंबई । नगर सह्याद्री - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी होताना दिसत आहे. राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटात...
मुंबई । नगर सह्याद्री -
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक घडामोडी होताना दिसत आहे. राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार तसेच मंत्री अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करताना दिसून येत आहे. या मंत्र्यांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीकेचा भडीमार करत आहे. सोमवारी (७ नोव्हेंबर) कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले असून ते आपल्या गटातील मंत्री तसेच नेत्यांची कानउघडणी करणार असल्याची माहिती आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिंदे गटाचे एकदिवसीय शिबिर होणार आहे. या शिबिरात शिंदे गटातील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांची कानउघडणी देखील करणार असल्याची माहिती आहे.
मागील काही दिवसांपासून मंत्री अब्दुल सत्तार, संतोष बांगर तसंच गुलाबराव पाटील हे वाच्याळ वक्तव्य करताना दिसून आले आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे दिवसेंदिवस शिंदे सरकारच्या अडचणी वाढत आहे. दुसरीकडे भाजप देखील शिंदे गटातील या वादग्रस्त नेत्यांमुळे नाराज असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या वादग्रस्त नेत्यांचे कान टोचणार असल्याची माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी शिंदे गटाचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात शिंदे गटाचे सर्व आमदार तसंच पदाधिकारी सहभागी होणार आहे. आगामी काळात पक्षाची रणनिती काय असणार यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झापले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सत्तारांना फोन करून त्यांनी कानउघाडणी केली आहे. माफी मागा, असे थेट आदेशही शिंदेंनी दिल्याचे समजते आहे.
COMMENTS