नवी दिल्ली। नगर सह्याद्री - ॲपल कंपनी विषयी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या कंपनीवर ब्राझील येथे कारवाई करण्यात आली आहे. ॲपल कंपनीने फ...
नवी दिल्ली। नगर सह्याद्री -
ॲपल कंपनी विषयी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या कंपनीवर ब्राझील येथे कारवाई करण्यात आली आहे. ॲपल कंपनीने फोनबरोबर चार्जर देणे बंद केले आहे. याच कारणाने ब्राझीलमध्ये ऑपरेशन डिस्चार्ज अंतर्गत सरकारने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. यात अनेक आयफोन जप्त केले आहे.
विजेवर चालणाऱ्या प्रत्येक वस्तूवर चार्जर देणे गरजेचे आहे. चार्जर नसेल तर ती वस्तू खरेदी केल्यावर ग्राहकांना चार्जरसाठी वेगळे पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे अशा वस्तूंवर चार्जर मिळवणे ग्राहकांचा हक्क असल्याचे असेल ब्राझील शासनाचे म्हणणे आहे.
ॲपल या कंपनीवर या आधी देखील अनेक वेळा कारवाई करण्यात आली आहे. वारंवार दंड भरावा लागत असला तरी अजूनही या कंपनीने चार्जरची सुवीधा उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळेच ब्राझील सरकारने आता दंड वसूल न करता मोबाईलवर थेट जप्ती आणली आहे. ब्राझीलमधील
ॲपलच्या सर्वच अधिकृत दुकानांवर ही कारवाई झाली आहे. ॲपल कंपनीने आयफोन बरोबर चार्जर न दिल्याने आणखीन एक गॅजेट खरेदी करण्यास ग्राहकांना भाग पाडले आहे. असे ब्राझील कोर्ट न्यायाधीशांनी म्हटले आहे. तसेच सुरुवातीला ब्राझील मंत्रालयाने कंपनीवर २.५ मिलीयन डॉलरचा दंड आकारला होता. असाच दंड फ्रांसमधूनही आकारला गेला आहे. तसेच गेल्याच महिन्यात ॲपलने २० मिलीयन डॉलर म्हणजेच १६४ कोटींचा दंड भरला आहे. एवढा दंड भरूनही अॅपलने चार्जर न पुरवल्याने आता कंपनीवर जप्तीची कारवाई केली जात आहे.
COMMENTS