मुंबई । नगर सह्याद्री - पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात उच्चभ्रू परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल, गुरुवार...
मुंबई । नगर सह्याद्री -
पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात उच्चभ्रू परिसरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल, गुरुवारी रात्री कोरेगाव कात्रज येथे गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एका तरुणाला ६ जणांनी जबर मारहाण केली आहे. सध्या जखमीला रुग्णालयात दाखल केले आसून त्याच्यावर उपचार सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील उच्चभ्रू परिसरातील कोरेगाव पार्कमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. पूर्व वैमन्यसातून दोन गटात राडा झाला आहे. यावेळी आरोपी सोन्या दोडमणी याने त्याच्याकडे असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला आहे. याप्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. यात दिसत असलेल्या दृश्यांनुसार, रस्त्याच्या कडेला एका मुलाला ६ जण जबर मारहाण करत आहे. यावेळी आरोपी सोन्या दोडमणी हवेत गोळीबार करतो. तसेच इतर सर्वजण त्या मुलाचा जीव घेण्याच्या हेतूने त्याच्या तोंडावर ७ ते ८ वेळा लाथाबुक्यांनी मारहाण करतात. तसेच नंतर एक दगड त्याच्या तोंडावर मारतात. या अमानुष मारहाणीने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मारहाण झाल्यावर हे सर्वजण एका कारमध्ये बसून तेथून निघून गेल्याचे दिसत आहे. सदर घटनेबाबत कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्व वैमन्यसातून ही मारहाण झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
COMMENTS