मुंबई । नगर सह्याद्री - शिवसंग्रामचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विनायक मेटे य...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसंग्रामचे प्रमुख आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. विनायक मेटे यांच्या गाडीच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हावेवर हा अपघात झाला होता.
अपघाताचा सीआयडीमार्फत तपास सुरु होता. सीआयडीने मेटे यांच्या चालकावर विरुद्ध रसायनी पोलिस ठाण्यात सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. एकनाथ कदम असे चालकाचे नाव आहे.
COMMENTS