शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने नेता सुभाष चौक येथे अभिवादन अहमदनगर । नगर सह्याद्री हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस...
शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने नेता सुभाष चौक येथे अभिवादन
अहमदनगर । नगर सह्याद्री
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची चेतना दिली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ दिले. देव, देश आणि धर्मासाठी झोकून देणारी पिढी निर्माण केली. शिवसैनिक त्यांच्यावर केवळ प्रेम करीत नाहीत तर त्यांची भक्ती करतात. आजही त्यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. नगरमधील शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारावर काम करत असल्याचे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने नेता सुभाष चौक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, सुरेखा कदम, उपजिल्हाप्रमुख गिरिष जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दत्ता जाधव, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, संदिप दातरंगे, अशोक दहिफळे, सुरेश तिवारी, गौरव ढोणे, श्रीकांत चेमटे, प्रा.अंबादास शिंदे, दिपक कावळे, पप्पू भाले, अरुण झेंडे, अण्णा घोलप, गणेश झिंजे, महिला आघाडीच्या शहरप्रमुख अरुणा गोयल, लता पठारे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे हिंदूत्वाचे धगधगते अग्निकुंड, त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन मराठी माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. धर्मरक्षणासाठी तमात हिंदूना प्रेरणा मिळाली. लाखो-करोडो लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी निर्माण करणारे असे व्यक्तीमत्व होते. युवकांसाठी ते नेहमीच आदर्शवत राहिले आहे, शिवसैनिक त्यांचे कार्य नव्यापिढीपर्यंत पोहचविण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, बाळासाहेब बोराटे आदिंनी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याचा गौरव केला.
COMMENTS