पोखरीजवळ अपघात, तीन गंभीर जखमी जामखेड | नगर सह्याद्री येथील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात निधन झाले. अपघातात त्यांच्या पत्नी...
पोखरीजवळ अपघात, तीन गंभीर जखमी
जामखेड | नगर सह्याद्री
येथील प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे अपघातात निधन झाले. अपघातात त्यांच्या पत्नी रेखा महेंद्र बोरा, वय (५२,) सुन जागृती भुषण बोरा (वय २८), नात लियाशा भुषण बोरा (वय ६) हे गंभीर जखमी झाले. जखमींवर जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगरकडे रवाना करण्यात आले आहे. तर मुलगा भुषण शांतिलाल बोरा (वय ३४) किरकोळ जखमी झाला आहे. जामखेड शहरातील प्रसिध्द भांड्याचे व्यापारी महेंद्र शांतिलाल बोरा (वय ५८ वर्षे) रा. जामखेड हे काही दिवसांपुर्वीच कुटुंबासमवेत राजस्थान या ठीकाणी देवदर्शनाला गेले होते. ते रात्री विमानाने पुणे विमानतळवर उतरले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या चारचाकी गाडीने ते सर्वजण पुण्याहून पहाटे जामखेड कडे निघाले होते. त्यांची गाडी दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास नगर जामखेड रोडवरील पोखरी जवळ धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर वाहन पलटी होऊन अपघात झाला. जखमींना तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठीकाणी दाखल करण्यात आले.या अपघातात प्रसिद्ध व्यापारी महेंद्र बोरा यांचे निधन झाले. गाडीतील अन्य तीघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जामखेड येथिल समर्थ हॉस्पिटल या ठीकाणी दाखल करण्यात आले होते. त्या नंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले आहे. तर त्यांचा मुलगा भुषण शांतिलाल बोरा (वय ३४) हा कीरकोळ जखमी असल्याने उपचार घेऊन सोडण्यात आले आहे.
COMMENTS