अहमदनगर । नगर सह्याद्री जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार नगर शहरासह जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थान...
अहमदनगर । नगर सह्याद्री
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार नगर शहरासह जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत. अवैध दारूवरील कारवाईनंतर पोलिसांनी कत्तलखान्यांवर कारवाई सुरू केल्या आहेत.
तोफखाना, एमआयडीसी पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली आहे. तोफखाना पोलिसांनी कोठला भागातील कुरेशी हॉटेलच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकून 270 किलो गोमांंस पकडले. गोमांस, सुरा, वजनकाटा असा 54 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार सचिन जगताप यांच्या फिर्यादीवरून मोईन बाबामिया कुरेशी (वय 37 रा. घासगल्ली, नगर) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, वसीम पठाण, जगताप, केरूळकर, धामणे यांच्या पथकाने रविवारी सकाळी ही कारवाई केली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जेऊर बायजाबाई (ता. नगर) येथील कत्तलखान्यावर कारवाई करून 32 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस अंमलदार भगवान वंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उस्मान रफिकखॉ पठाण (वय 40), रफिकखॉ कासम पठाण (वय 60), सज्जू रहिम शेख (तिघे रा. जेऊर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS