मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सु...
मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मानसी नाईकचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.त्यावर आता मानसी नाईकने मौन सोडलं असून मी घटस्फोटासाठी अर्ज दिल्याची कबुली दिली आहे. यानंतर तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केल्या होत्या ज्यात तिने आपल्या पतीला टोले लगावले होते, मात्र आता तिच्या पतीने पोस्ट शेअर केली आहे. प्रदीप सोशल मीडियावर सक्रीय असतो. आपले फोटोज तो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्याने असं म्हंटल आहे की इतर कोण माझ्याबद्दल काय बोलतं याचा मला फरक पडत नाही, कारण मला माहितेय मी कोण आहे आणि याचा मला अभिमान आहे.’ अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रदीप मूळचा हरियाणाचा असून तो मॉडेल आणि बॉक्सर देखील आहे. मानसी आणि त्याचे अनेक रील्स व्हायरल होत असतात. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. मानसी नाईकने फेब्रुवारी २०२० मध्या तिच्या आणि प्रदीपच्या नात्याबद्दलची अधिकृत घोषणा केली होती. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे बोललं जातं होत. लग्नाआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते.
COMMENTS