प्रभाग 8 कल्याण रोड येथील समाधाननगर येथे ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ अहमदनगर । नगर सह्याद्री प्रत्येक नागरिकांना सर्वप्रकारच्या मुलभुत सुव...
प्रभाग 8 कल्याण रोड येथील समाधाननगर येथे ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ
अहमदनगर । नगर सह्याद्री
प्रत्येक नागरिकांना सर्वप्रकारच्या मुलभुत सुविधा या मिळाल्या पाहिजे, यासाठी मनपाच्या माध्यमातून सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहे. कल्याणरोड परिसरात होत असलेल्या विविध विकास कामांमुळे वसाहतींची संख्या वाढत आहे. त्यांना सुविधा देण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. नगरसेवकांच्या पाठपुराव्यामुळे या भागातील प्रत्येक कॉलनी, वसाहतीतील कामे मार्गी लागत आहेत. विकास कामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देऊ यापुढेही अशीच कामे भागात होतील, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
प्रभाग क्र.8 मध्ये सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, शाम नळकांडे यांच्या प्रयत्नातून व महापौर रोहिणी शेंडगे यांच्या निधीतून कल्याण रोड येथील समाधाननगर येथे ड्रेनेजलाईन कामाचा शुभारंभ महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी महिला बाल कल्याण सभापती पुष्पाताई बोरुडे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, गणेश कवडे, रामा गुंडू, ईश्वर शेळके, प्रफुल्ल परदेशी, प्रमोद जरे, सुनिल परदेशी, नानासाहेब शिंदे, राजू तांबोळी, रशिद तांबोळी, भगवान गायसमुद्रे, दादा गोलवड आदि उपस्थित होते.
याप्रसंगी शाम नळकांडे म्हणाले, प्रभागातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, त्यांचे प्रश्न सुटावेत, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रत्येक भागात गरजेनुसार कामे होत आहे, टप्प्याटप्प्याने सर्वच कॉलनीत ड्रेनेज, पिण्याच्या पाण्याची लाईन, स्ट्रीट लाईट, रस्ते या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. प्रभागाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे सांगितले.
याप्रसंगी पुष्पाताई बोरुडे, संभाजी कदम, सचिन शिंदे आदिंनी आपल्या मनोगतात प्रभागाच्या विकासासाठी प्रयत्न करु, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर शेळके यांनी केले तर सुनिल परदेशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास सचिन गोलवड, शरद दाते, बाळासाहेब पवार, एकनाथ भोगाडे, राजेंद्र सोनमाळी, केरु डोखे, संजय घायवट, मेजर धोत्रे, प्रविण थोरात, अझरुद्दीन सय्यद, बाळासाहेब सोनमाळी, नितीन सोनमाळी, इम्रान तांबोळी, संपत पंडित, प्रितम बिज्जा, निवडूंगे सर, सोनवणे, साहेबराव गांगर्डे, प्रशांत कोक्कुल, प्रफुल्ल काळे, विमल गोलवड, नसिम तांबोळी, आशा पवार, झुंबरबाई डोखे, जाई भोगाडे, अर्चना गोलवड, स्नेहल शिंदे, लिलाबाई गायसमुद्रे, आस्मा तांबोळी, पुजा जरे, राखी परदेशी, सोनाली दाते, संध्या घायवट, शारदा बिज्जा, सोनाली पोता, जया डोखे, प्रमिला जाले, शितल सोनमाळी, सुनिता थोरात, अंजुम तांबोळी, रोहिणी पंडित, रोहिणी शेळके, सना तांबोळी, वैशाली खोपे, आशा सोनमाळी, राधा कोक्कुल, प्रियंता काळे आदिंसह नागरिक उपस्थित होते.
COMMENTS