इंडोनेशियातील जकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यादरम्यान २० जणांना आपला जीव गमवावा लागला.
नगर सह्याद्री / नवी दिल्ली -
इंडोनेशियातील जकार्ता येथे ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यादरम्यान २० जणांना आपला जीव गमवावा लागला, तर ३०० हून अधिक लोक जखमी झाल्याचे सियांजूरच्या प्रशासनाचे प्रमुख हरमन सुहरमन यांनी सांगितले. इमारतींमध्ये अडकल्यामुळे बहुतेकांना फ्रॅक्चर झाले आहे. मृतांचा आकडाही वाढू शकतो. असेही ते म्हणाले. भूकंपाचा केंद्रबिंदू पश्चिम जावाच्या सियांजूरमध्ये १० किमी खोलीवर होता. भूकंपामुळे शहरातील इमारती हादरू लागल्या, त्यामुळे लोक घराबाहेर आले.
याआधी शुक्रवारी रात्री पश्चिम इंडोनेशियामध्ये भूकंपाचा जोरदार धक्का बसला होता. या काळात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने (यूएसजीएस) भूकंपाची तीव्रता ६.९ इतकी नोंदवली होती. त्याचा केंद्रबिंदू दक्षिण बेंगकुलूपासून २०२ किमी नैऋत्येस २५ किमी खोलीवर होता. यानंतर दुसरा धक्का बसला, ज्याची तीव्रता ५.४ होती.
COMMENTS