अहमदनगर | नगर सह्याद्री बाजरीची भाकरी, आमटी या मोफत अन्नदानाची दखल घेत ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्था...
अहमदनगर | नगर सह्याद्री
बाजरीची भाकरी, आमटी या मोफत अन्नदानाची दखल घेत ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थानचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे प्रमाणपत्र नुकतेच प्रदान करण्यात आले.
देवस्थानाजवळ झालेल्या कार्यक्रमात गदर-२ या चित्रपटाचे प्रोड्युसर प्रविंद्र भाटिया, पंडित बिपीन चतुर्वेदी, वरुण शर्मा, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे समन्वयक दीपक हारके यांच्या हस्ते देवस्थानच्या विश्वस्तांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले. भैरवनाथ देवस्थानजवळ गेल्या दोन दशकांपासून प्रत्येक रविवारी बाजरीची भाकरी, आमटी असा मोफत महाप्रसाद दिला जातो.
सुमारे दहा हजार भाविक प्रत्येक रविवारी या महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच प्रत्येक वर्षी सप्ताह काळात सुमारे ५० हजार भाविकांना मोफत अन्नदान केले जाते. या वेगळ्या उपक्रमाची दखल ‘इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये घेण्यात आली आहे.
COMMENTS