साइड पट्ट्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष, मुदत संपत आल्याने ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला तिलांजली सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील कडू...
साइड पट्ट्यांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष, मुदत संपत आल्याने ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला तिलांजली
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील कडूस-वाळवणे रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या कडेला साईडपट्यांवर झाडाझुडुपांचा विळाखा तयार झाला आहे. रस्ता अरुंद झाल्यामुळे अपघात होण्याची दाट शयता निर्माण झाली असून काही ठिकाणी साईडपट्या पुर्ण खचल्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.तर दुसरीकडे रस्ता देखभाल दुरुस्तीची मुदत डिसेंबर २०२२ रोजी संपत असल्याने ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामाला तिलांजली दिली जात आहे. यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रथमच कडूस- भोयरे गांगर्डा- रुईछत्रपती ते वाळवणे ११ कि.मी चा रस्त्याचे काम जानेवारी २०१८ या वर्षी पूर्ण झाले. मात्र या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे झाले असून यावर खाच खलगे, चढ उतार मोठ्या प्रमाणात ठेवले आहेत.
रस्ता पूर्ण झाल्यानंतर प्रथमच चालू वर्षी मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असल्यामुळे कडूस-भोयरे गांगर्डा-रुईछत्रपती-वाळवणे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे छोटे-मोठे अपघात झाले असून त्यात काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. रुईछत्रपती बाह्यवळण रस्त्यासाठी बनवलेल्या पुलाचे कठडे चार वर्षांपूर्वी तुटले असून अद्याप ठेकेदाराने ते दुरूस्त केले नसल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.६ ते ७ गावांची मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा शहराकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, दुध उत्पादक, कंपनी कामगारांची तसेच शेतकर्यांनी पिकविलेल्या मालाची विक्री करण्यासाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा, पारनेर, अहमदनगर, पुणे या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असते.
तत्कालीन माजी आमदार विजय औटी यांच्या प्रयत्नातून या ११ कि.मी. रस्त्यासाठी ५ कोटी २८ लाख रुपये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले होते. त्याचे भूमिपूजन माजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत आ. औटी यांनी कडूस येथे केले. रस्ता पूर्ण करण्याचा कालावधी संपून चार वर्ष पूर्ण झाले असून अद्याप रूईछत्रपती येथिल बाह्यवळण रस्ता जैसे थेच आहे. रस्त्यावर खडी व डांबराचा वापर कमी प्रमाणात झाल्याने मोठ्या प्रमाणात खाच खलगे आहेत. रस्ता देखभालीसाठी संबधित ठेकेदाराला पाच वर्षांचा कालावधी असून काम पूर्ण केल्यानंतर एक वर्षापूर्वी प्रथमच रस्त्याची डागडुजी करण्यात आली. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्यांवर मोठमोठ्या काटेरी बाभळी, इतर झाडे झुडपे उगवली असल्याने व ठिकठिकाणी रस्ता पूर्णपणे खचल्यामुळे अपघात होण्याची दाट शयता निर्माण झाली आहे.
आमदार लंके यांनी लक्ष घालावे
कडूस- भोयरे गागर्डा ते वाळवणे रस्त्या हा दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे.या रस्त्यावर मोठ- मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून रस्ता देखभाल दुरूस्तीकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करत आहे. यात पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी लक्ष घालून ठेकेदाराकडून मुदत संपन्यापूर्वी रस्त्यावर पुन्हा नवीन लेअर मारून रस्त्याची दुरूस्ती करून घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांसह प्रवाशांमधून केली जात आहे.
COMMENTS