कान्हूरपठार | नगर सह्याद्री कान्हूर पठार येथील रयत शिक्षण संस्थेचे जनता विद्या मंदिर या हायस्कूलमध्ये १९७७ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ...
कान्हूर पठार येथील रयत शिक्षण संस्थेचे जनता विद्या मंदिर या हायस्कूलमध्ये १९७७ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
१९७७ चे विद्यार्थी व विद्यार्थींनी हे १० वी नंतरचे पुढील शिक्षण घेवून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करून आता ते सेवा निवृत्त झालेले आहेत. विलास बापू ठुबे यांना आपल्या १९७७ च्या एसएससीच्या विद्यार्थी व विद्यार्थींनीना व्हॉट्सअप ग्रुपमार्फत एकत्र आणावे असे वाटले. त्यानुसार विलास ठुबे, भागा नवले, लिला मोरे, मीना भळगट, रघुनाथ व्यवहारे, रमेश भागवत, मारुती गायखे यांनी एकत्र येवून चर्चा केली असता १९७७ च्या एसएससी बॅचच्या विद्यार्थी व विद्यार्थींनींचा नविन व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा असे ठरले. त्यानुसार विलास ठुबे यांनी दि. १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी नविन व्हॉट्सअप ग्रुप बनवून सर्व माजी विद्यार्थी यांची नावाची यादी व मोबाईल नंबर घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी सर्व मित्र-मैत्रींनी मदत केली. त्यानंतर ग्रुपचा एकत्रित ग्रुप कार्यक्रम करायचा असे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यानुसार २० नोव्हेंबर २०२२ रोजी कान्हूर पठार येथील व्यवहारे लॉन्स मंगल कार्यालय येथे कार्यक्रम करण्याचे निश्चित करण्यात आले. सर्वजण जमल्यानंतर वर्गातील दिवंगत झालेल्या मित्र-मैत्रीनींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सरस्वती व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून दिपप्रज्वलन औटीबाई यांच्या हस्ते करण्यात आले. औटीबाई यांचा साडी, शाल, श्रीफळ व गुच्छे देऊन महिलांच्या हस्ते सत्कार केला.
ठरल्यानुसार २० नोव्हेंबर २०२२ रोजी व्यवहारे लॉन्स या मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ४ वा. पर्यंत कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. त्यात प्रत्येकाने स्टेजवर जाऊन त्याने १० वी नंतर शिक्षण कुठे घेतले, कोठे नोकरी केली, किती वर्षे नोकरी झाली, तसेच त्यांची असणार्या अपत्यांची संपूर्ण माहिती सांगितली. तसेच सर्वजण शाळेत असताना बालपणीच्या घडलेल्या घटना, शिक्षकांबाबतची चर्चा झाली.
दहावीचे मित्र तब्बल ४५ वर्षानंतर भेटल्यामुुळे सर्वांना खूप आनंद झाला. तसेच दरवर्षी परत असा कार्यक्रम घेण्यात यावा असे सर्वांनी सूचविले. त्यानुसार असाच व त्यापेक्षा चांगला कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येईल असे सांगितले. सदर कार्यक्रमास एकूण ३१ मित्र व मैत्रीणी कुटुंबासह हजर होते.
COMMENTS