जलजीवन मिशन योजनेसाठी १ कोटी १८ लक्ष निधी पारनेर | नगर सह्याद्री पारनेर जुन्नर तालुयाच्या हाती असणार्या पळसपुर गावांसह वाड्या वस्त्या वर...
जलजीवन मिशन योजनेसाठी १ कोटी १८ लक्ष निधी
पारनेर | नगर सह्याद्रीपारनेर जुन्नर तालुयाच्या हाती असणार्या पळसपुर गावांसह वाड्या वस्त्या वरील महिलांना गेल्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. परंतु आमदार नीलेश लंके यांच्यामुळे या महिलांची पायपिट थांबणार असून जलजीवन मिशनच्या माध्यमातून महिलांच्या डोयावरील हंडा खाली उतरणार असल्याची ग्वाही जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राणी नीलेश लंके यांनी दिली आहे. तर दुसरीकडे विकासापासून वंचित असलेल्या पळसपुर गावासाठी जलजीवन मिशन योजनेसाठी १ कोटी १८ लक्ष निधी, ओपन जिम साठी ७.५ लक्ष, संरक्षण भिंत बांधणे १० लक्ष, पाझर तलाव दुरुस्ती साठी सुमारे ५९ लक्ष असा जवळपास दोन कोटी रुपयांचा निधी या गावासाठी आमदार लंके यांनी उपलब्ध करून दिला असून या पुढील काळात सुद्धा निधी देण्याचे आश्वासन राणीताई लंके यांनी दिले आहे.
पारनेर तालुयाचे आमदार नीलेश लंके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या पळसपूर वि.का.सेवा कार्यकारी सोसायटी इमारतीचा उद्घाटन समारंभ रविवारी दिनांक १३ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हा परिषद सदस्या सौ. राणी लंके यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी वि.का.सेवा सोसायटी चेअरमन बळवंत आहेर, व्हा.चेअरमन बाळासाहेब डोंगरे, संचालक मंडळ, सरपंच सुवर्णा आहेर, ग्रा.प.सदस्य मनोज शिंदे, मा.प.स.सदस्य धोंडीभाऊ आहेर, मुलिका विद्यालय प्राचार्य सहदेव आहेर, रंगनाथ आहेर, धोंडिभाऊ चव्हाण, नामदेव आहेर, बबन आहेर, रामदास ढोले, यशवंत ढोले, सरपंच पियूष गाजरे, निलेश लंके प्रतिष्ठान उपाध्यक्ष पोपट गुंड, धनराज आहेर, कोंडीराम शिंदे, हरी आहेर, भास्कर ढोले, सतीश आहेर, सुरेखा डोंगरे, स्वप्नील गफले, मयुर शिंदे, भानुदास अल्हाट, शांताबाई पावडे, गिताभाऊ आहेर, प्रभाकर पोपळघट, राजेश ढोले, गणेश आहेर, उमा ढोले, सुनील आहेर, हनुमंत पवार, दत्ता भाईक, बाळशिराम आहेर, निशांत आहेर, भास्कर सोनवणे, हनुमंत आहेर, पप्पू गराडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS