नवी दिल्ली। नगर सह्याद्री - दिल्लीत एक काळजाची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केले त्याच प्रियकराने प्रेयसीचा गळा चि...
नवी दिल्ली। नगर सह्याद्री -
दिल्लीत एक काळजाची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ज्याच्यावर जिवापाड प्रेम केले त्याच प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरून तिची हत्या केली आहे. फक्त हत्या करुन तो थांबला नाही तर पुढे प्रेयसीच्या शरीराचे तब्बल ३५ तुकडेही केले आहे. दिल्ली येथील मेहरौली परिसरात ही घटना घडली आहे.
आफताब असे हत्या करणाऱ्याचे नाव असून सध्या तो पेलिसांच्या अटकेत आहे. ही घटना ६ महिन्यांपूर्वी घडली आहे. मुंबईत कॉल सेंटरमध्ये श्रध्दा आणि आफताब हे दोघे काम करत होते. दोघांची चांगली मैत्री झाली होती. नंतर ही मैत्री प्रेमात बदलली आहे. श्रध्दाने या विषयी तिच्या घरी सांगितल्यावर घरच्यांनी त्यांच्या नात्याला विरोध दर्शवला होता. त्यामुळे दोघांनी मुंबईहून दिल्ली गाठली आहे. दोघेही लिव इन रिलेशनमध्ये राहत होते. त्यामुळे आपल्या प्रेमाला पती पत्नीचे नाव मिळावे असे श्रध्दाचे मत होते. ती सतत आफताबला लग्नासाठी विचारत होती.
मात्र आफताबला तिच्याशी लग्न करायचे नव्हते त्यामुळे सुरूवातीला त्याने श्रध्दाला खूप टाळले आहे. नंतर या विषयावरून त्यांच्यात खूप वाद होऊ लागले. अशात १८ मे रोजी या दोघांचे खूप जोरदार भांडण झाले आहे. रागाच्या भरात आफताबने श्रध्दावर चाकूने वार केले आहे. खून केल्यावर आफताबने मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी याचा खूप विचार केला. त्याने मृतदेहाचे एकूण ३५ तुकडे केले आहे. हे सर्व तुकडे त्याने १८ दिवस घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. रोज मध्य रात्री तो यातील काही तुकडे जंगलात नेऊन टाकत होता अशी महिती पोलिस सुत्रांकडून मिळाली आहे.
श्रध्दाच्या घरचे तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तिच्याशी संपर्क होत नव्हता. त्यांनी तिचे सोशल मीडिया अकाउंट देखील तपासले. तेव्हा त्यावर देखील बरेच महिने कोणतीही पोस्ट दिसली नाही. त्यामुळे श्रध्दाचे बाबा दिल्लीतील छतपूर येथील तिच्या घरी गेले. तेव्हा दाराला असलेले कुलूप पाहून त्यांच्या मनात पहिली शंकेची पाल चुकचूकली आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांत त्यांची मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सुत्र आणि इतर माहितीच्या आधारे आफताबचा शोध घेतला आहे. सापळा रचत त्याला अटक करण्यात आली. चौकशी दरम्याने त्याने लग्नासाठी श्रध्दा सतत विचारत असल्याने तिचा खून केल्याचे कबूल केले आहे.
Delhi | Accused Aftab Poonawalla, who allegedly killed his live-in partner, chopped her body into pieces and disposed them off in nearby areas, has been sent to 5-day Police custody. https://t.co/CHf5rLVCG7 pic.twitter.com/UatG4NnsFp
— ANI (@ANI) November 14, 2022
COMMENTS