गुरेढोरे रस्त्यावर सोडल्याप्रकरणी गुजरातमधील न्यायालयाने एका व्यक्तीला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.
नगर सह्याद्री / नवी दिल्ली -
गुरेढोरे रस्त्यावर सोडल्याप्रकरणी गुजरातमधील न्यायालयाने एका व्यक्तीला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. प्रकाश जयराम देसाई असे या व्यक्तीचे नाव असून त्याने त्याच्या गायी रस्त्यावर सोडून लोकांचा जीव धोक्यात घालल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. तसेच अहमदाबाद महानगरपालिकेच्या पशु उपद्रव नियंत्रण विभागाच्या (सीएनसीडी) पथकाला धमकावल्याबद्दल अतिरिक्त सत्र न्यायाधीश सारंगा व्यास यांनी त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
शहापूर येथील रहिवासी, प्रकाश जयराम देसाई यांच्यावर जुलै २०१९ मध्ये पाच प्राण्यांना रस्त्यावर सोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. देसाईने संघातील सदस्यांशी गैरवर्तन केले आणि त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडण्याची धमकी दिली.
देसाईवर आयपीसीच्या कलम ३०८, १८६, ५०६(२), गुजरात पोलीस कायद्यांतर्गत आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS