मुंबई । नगर सह्याद्री - सोने - चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या (Gold) दरात सलग दुसऱ्या दिवस घसरण झाली आहे...
मुंबई । नगर सह्याद्री -
सोने - चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या (Gold) दरात सलग दुसऱ्या दिवस घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोनं खरेदी करणं स्वस्त झालं आहे. सोन्याच्या दरात घसरण झाली असली, तरी चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे.
बुधवारी सराफा बाजार खुलताच, सोन्याच्या दरात 80 रुपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 48,340 हजारांवर आला आहे. याशिवास 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 110 रुपयांनी घसरून 52 हजार 640 रुपये इतका झाला आहे.
एकीकडे सोन्याच्या भावात घसरण झाली असली, तरी दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र, वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज चांदीचा दरात प्रतिकिलो 180 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचे दर 61 हजार 166 रुपयांवर पोहचले आहे. सराफा बाजार उघडताच, चांदीचा भाव 61,125 रुपयांवर आला होता. मात्र, त्यानंतर त्यात वाढ झाली आहे.
COMMENTS