पारनेर | नगर सह्याद्री पारनेर नगरपंचायतील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व पदाधिकार्यांसह नगरसेवकांनी पारनेर शहरात कामे केली जाणार आहे. ती दर्जेद...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर नगरपंचायतील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व पदाधिकार्यांसह नगरसेवकांनी पारनेर शहरात कामे केली जाणार आहे. ती दर्जेदार करण्याचा निर्णय घेतला असून याचा श्रीगणेशा प्रभाग क्रमांक १० मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या दर्जेदार कामाची दखल घेऊन जिजाऊ कॉलनीतील पारनेर शहरवासीयांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदाधिकार्यांचा व हे दर्जेदार काम करणार्या ठेकेदाराचा रविवारी सन्मान केला आहे.
पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखाताई भालेकर, सभापती योगेश मते, डॉ.विद्या कावरे, प्रियंका औटी, नितीन अडसूळ तसेच नगरसेवक अशोक चेडे, हिमानी नगरे, भूषण शेलार, निता औटी, सुप्रिया शिंदे यांच्यासह डॉटर बाळासाहेब कावरे, बाळासाहेब नगरे, विजय भास्करराव औटी, डॉटर सचिन औटी, सुभाष शिंदे, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख बंडूशेठ गायकवाड, उपप्रमुख रमीजशेठ राजे, उप तालुकाप्रमुख अर्जुन बडे यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी स्वतः लक्ष घालत घरचे काम समजून हा सिमेंट काँक्रिटीकरणाचा दर्जेदार रस्ता तयार करून घेतला.
आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजय औटी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर, प्रभाग क्रमांक १० च्या नगरसेविका उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर यांच्या प्रयत्नातून पारनेर नगरपंचायत दलितेत्तर योजने अंतर्गत ११ लक्ष रुपयाच्या संजय रेपाळे ते बर्वे मेजर घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण एक उल्लेखनीय व शासनाच्या नियमाप्रमाणे दर्जेदार रस्ता काँक्रिटीकरणाचा एक आदर्श नमुना म्हणून हा रस्ता चर्चेचा व कौतुकाचा विषय झाला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक चेडे होते. यावेळी अशोक चेडे, योगेश मते, हिमानी नगरे, सूभाष शिंदे, डॉ. सचिन औटी. भूषण शेलार, श्रीकांत चौरे यांची भाषणे झाली.
प्रभाग क्रमांक १० मध्ये दर्जेदार रस्ता करण्यासाठी थेट पदाधिकारांनी पुढाकार घेतल्याने शासनाच्या अंदाजपत्रका प्रमाणे दर्जेदार सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करावा असे संबंधित नगरपंचायतचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी सदर कामाचे ठेकेदार प्रवीण वारुळे यांना सांगितले. व अंदाजपत्रका प्रमाणे काम करून घेण्यासाठी नगरपंचायतचे बांधकाम अभियंता सुनील गांगुर्डे व भोसले यांना सांगण्यात आले.
पारनेर शहरातील उच्चशिक्षित सोसायटी म्हणून ओळख असणार्या या सोसायटी मध्ये पारनेर नगरपंचायतच्या सर्व मूलभूत सुविधा त्या मध्ये सांडपाण्याचे व्यवस्थापन असो की पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी असो या सर्वांची चोख व्यवस्था करत भविष्यात कुठलीही अडचण न ठेवता सोसायटी मधील वीस ते पंचवीस कुटुंबांनी स्वतः घरचे काम म्हणून दर्जेदार काम ठेकेदार प्रवीण वारुळे यांच्याकडून करून घेतले. आपले स्वतःचे काम आहे असे समजून जय जिजाऊ कॉलनीतील सर्व सुशिक्षित नागरिकांनी करून घेतलेल्या रस्त्यामुळे समाधान व्यक्त करत सदर ठेकेदार प्रवीण वारुळे व हे काम करून घेणारे नगरसेवक श्रीकांत चौरे यांच्यासह सर्व नगरसेवक सहकारी मित्रांचा सत्कार जय जिजाऊ कॉलनी मध्ये संजय रेपाळे, रोहिदास वाबळे, जयप्रकाश साठे, शेरकर, बेलोटे, बर्वे, घुले, रेपाळे, ठाणगे यांच्यासह सर्व जय जिजाऊ कॉलनीतील समस्त माता भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आला.
टक्केवारीच्या या पाशवी फेर्यात अडकल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता तर ढासळते परंतु एक किवा दोन वर्षांमध्येच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पुन्हा काढावे लागते हे टाळण्यासाठी, रस्ता काँक्रिटीकरणाची गुणवत्ता सुधारावयाची असेल तर असे दर्जेदार काम होणे गरजेचे आहे. त्याचे बक्षीस कौतुक रूपाने स्वतः नागरिक देतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तालुयातील इतरही गावांमधील नागरिकांनी व ठेकेदारांनी सदर रस्त्याला भेट द्यावी व कुठल्याही पदाधिकार्याला कुठलीही टक्केवारी न देता असे दर्जेदार रस्ते ठेकेदारांनी तयार करावेत तरच विकास कामांचा व गुणवत्तेचा दर्जा टिकेल व दुरुस्तीसाठी होणार्या लाखा रुपये खर्चाचा अपव्यय टळेल असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष भालेकर यांनी सांगितले.
पारनेर शहरात दर्जेदार विकास कामांचा श्री गणेशा: भालेकर
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून हा निधी पारनेर नगरपंचायतीला मिळाला होता. विकास कामे ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शासनाच्या निधीतून विकास कामांसाठी जो काय पैसा मिळतो. त्याचा विनीयोग हा पदाधिकार्यांनी व जागरूक नागरिकांनी केला तर आदर्श काम उभे राहू शकते हे या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याच्या माध्यमातून दिसून आले आहे. रस्त्याची गुणवत्ता व दर्जा पाहून पारनेर तालुयात सर्वत्र असे दर्जेदार रस्ते व्हावेत अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांनी व्यक्त केली आहे.
COMMENTS