मुंबई । नगर सह्याद्री - मिझोरामच्या हंथियाल जिल्ह्यात सोमवारी दुपारी दगडी खाण ढासाळली. या अपघातात १२ मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ...
मुंबई । नगर सह्याद्री -
मिझोरामच्या हंथियाल जिल्ह्यात सोमवारी दुपारी दगडी खाण ढासाळली. या अपघातात १२ मजूर अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. ही घटना मौध परिसरात दुपारी तीनच्या सुमारास घडली. पथकांनी बचावकार्य सुरू केले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये सर्व मजूर बिहारचे असल्याचे सांगण्यात येत आहे. एसपी विनीत कुमार म्हणाले, अपघाताच्या वेळी १३ कामगार खाणीत काम करत होते. एक मजूर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. खाणीत मजुरांसोबतच ५ खोदकाम यंत्रे आणि अनेक ड्रिलिंग मशिनही गाडल्या गेल्या आहे. वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
COMMENTS