मुंबई । नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदार, खासदारांना घेऊन आज पुन्हा गुवाहाटीला जात आहे. गुवाहाटीला जायचे नेमकं क...
मुंबई । नगर सह्याद्री -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटातील आमदार, खासदारांना घेऊन आज पुन्हा गुवाहाटीला जात आहे. गुवाहाटीला जायचे नेमकं कारण काय आहे. तर गुवाहाटीला हे आमदार, खासदार कुटुंबासह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. मुंबई विमानतळावरून शिंदे गट रवाना झाला असून थोड्याच वेळात गुवाहाटीला पोहोचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही राज्यातील बळीराजाला सुखी होऊ दे, जनतेच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊ दे, राज्यावरील अरिष्ट जाऊ दे ही प्रार्थना कामाख्यादेवीकडे करणार आहोत. राज्यासाठीच आम्ही हे करत आहोत.
तर, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुवाहटीवरून परतताना जास्त आमदार घेऊन येऊ, असे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिंदे गट या दौऱ्यात ठाकरे गटाला आणखी काही धक्का देणार का?, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
मुंबई विमानतळावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्यावेळी आम्ही गुवाहाटीवरून घाई गडबडीत आलो होतो. त्यामुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पुन्हा येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार आता श्रद्धेने जात आहोत. त्यात कुणाला काही वाटण्याची आवश्यकता नाही. असे वाटत नाही.
कामाख्या देवीने आमची इच्छा पूर्ण केली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले. त्यामुळे देवीकडे आणखी काही मागण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
सहा महिन्यांपूर्वी शिंदे यांच्यासह ५० आमदार गुवाहाटीला गेले होते. त्या वेळी शिंदे हे मुख्यमंत्री व्हावे, असा नवस कामाख्या देवीला केला होता. हा नवस पूर्ण झाल्याने तो फेडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह निघाले आहे.
‘आपण या दौऱ्यात आहोत. या दौऱ्यासाठी ‘काय शिंदे-फडणवीस सरकार, काय त्याचा कारभार आणि काय महाराष्ट्र, सगळं एकदम ओके’ हा नवा डायलाॅग तयार केल्याचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले आहे.
COMMENTS