तज्ज्ञांची विविध मते : काही राशींना सावधानतेचा इशारा अहमदनगर | नगर सह्याद्री मंगळवारी (दि. ८) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण ...
तज्ज्ञांची विविध मते : काही राशींना सावधानतेचा इशारा
मंगळवारी (दि. ८) कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण आहे. पूर्व भारतात खग्रास चंद्रग्रहण दिसेल, उर्वरित भारतात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे.
ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी ८ नोव्हेंबरच्या सूर्योदयापासून सायंकाळी ६:१९ पर्यंत ग्रहणाचे वेध असतील. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी आणि गर्भवती यांनी मंगळवारी सकाळी ११ पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध, इत्यादी करता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
ग्रहण स्पर्श १४:३९, ग्रहण मध्य १६:३० आणि ग्रहण मोक्ष १८:१९ अशा वेळा आहेत. या वेळा संपूर्ण भारतासाठी आहेत. तसेच राशीनिहाय हे ग्रहण मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभ मानले जाते. तसेच सिंह, तुला, धनु, मीन या राशींना मिश्र स्वरूपाचे मानले जाते. मेष, वृषभ, कन्या, मकर या राशींना मात्र अनिष्ट मानले जाते. त्यामुळे या राशींच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. यासाठी त्यांनी दाते पंचांग याचा संदर्भ घेतल्याचे म्हटले आहे.
COMMENTS