अहमदनगर | नगर सह्याद्री कला संचलनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धेम...
कला संचलनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद आयोजित जिल्हास्तरीय बालचित्रकला स्पर्धेमध्ये पारनेर तालुक्यातील सुपा येथील शाळेतील सिद्धांंत गुलाब जाधव (इयत्ता तिसरी) या विद्यार्थ्यांने ७ ते ९ या वयोगटातून जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवला. बालदिनाच्या दिवशी शिक्षणाधाकिारी कडूस यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याला आई, वडिल, वर्गशिक्षिका प्रतिभा पाचारणे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका मेरगू मॅडम, अध्यापिका औटी मॅडम, पठारे मॅडम, सोनवणे मॅडम यांनी शाळेच्या वतीने त्याचे अभिनंदन केले. तसेच शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धामणे, महापलिका प्रशासन अधिकारी थोरात, विस्तारअधिकारी सोनार, ढवळे, लाळगे, संस्थाचालक छायाताई फिरोदिया यांनीही सिद्धांतचे अभिनंदन केले.
COMMENTS