माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सुपा । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त कार्यभार दिल्याम...
माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन
सुपा । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील माध्यमिक शिक्षकांना अतिरिक्त कार्यभार दिल्यामुळे तसेच बी.एल.ओ. चे व निवडणूक असे शैक्षणिक कामे दिल्यामुळे तालुका शिक्षक संघटनेच्या वतीने पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकंठे व गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की पारनेर तालुक्यातील सर्व माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून शासनाने नोकर भरती बंदी घातल्याने माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदांचा कार्यभार इतर सेवकांवर पडत आहे. त्याचबरोबर माध्यमिक शाळेमध्ये अनेक स्पर्धा परीक्षांचे आयोजनही शासनामार्फत केले जाते. त्यामध्ये नवोदय प्रवेश परीक्षा प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा एन. एम.एम.एस. परीक्षा एम.टी. एस.परीक्षा एन.टी.एस.परीक्षा हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा इतिहास भूगोल गणित प्रज्ञाशोध परीक्षा ज्ञानवर्धनि स्पर्धा परीक्षा अशा विविध परीक्षांचे तसेच विज्ञान प्रदर्शन क्रीडा विभाग आदी स्तरावरून कामकाज केले जाते. तसेच इयत्ता दहावीचा जादा तास बोर्ड परीक्षा पेपर तपासणी आदी कामांचा अतिरिक्त तान रिक्त पदांमुळे उपलब्ध सेवकांवर पडत आहे. या सर्व परीक्षांचा कार्यभार व रिक्त पदांचा विचार करता येणार्या निवडणुकीच्या कामासाठी ठराविक शाळा मधूनच सर्व सेवकांची नियुक्ती न करता सर्व शाळांमधून प्रत्येकी तीन ते चार सेवकांचा सहभाग घेण्याबाबत विचार व्हावा तसेच बी एल ओ. कामकाजामध्ये माध्यमिक च्या शिक्षकांना न घेता इतर प्राथमिक शिक्षकांचा तेथे विचार करण्यात यावा बी एल ओ सारख्या अशैक्षणिक कामांसाठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी पारनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब निवडुंगे, सचिव भगवान राऊत, उपाध्यक्ष सुदाम दळवी, सचिव भगवान राऊत, शशिकांत भालेकर, सुरेश थोरात, बाबासाहेब दौंड, जयवंत पुजारी, संतोष व्यवहारे, योगेश खांडरे, संदीप शिंदे, विजय पठारे, संपत गुंड, संजय कारखिले, राजाराम शिंदे, रमेश गायकवाड, सुनील औटी, संजय खोडदे, डी एस ठवाळ, डी.व्ही.खोसे आर. सी. दरेकर मुळे, आय आय तांबोळी, वी. एम.मुळे, ए.पी.भोंडवे, मंगेश काळे, एम एस इनामदार आदी उपस्थित होते.
माध्यमिक शिक्षकांना शैक्षणिक कामाचा ताण आहे. अनेक शाळांवर अनेक वर्षापासून रिक्त जागा भरलेल्या नाहीत. त्यामुळे उपलब्ध शिक्षक हे कामकाज करत आहेत. त्यातच निवडणूक कामकाज व बीएलओ या जबाबदार्या कशा पार पाडायच्या व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे द्यायचे. याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा व माध्यमिक च्या शिक्षकांना या शैक्षणिक कामापासून दूर ठेवावे.
- सुदाम दळवी
उपाध्यक्ष, पारनेर तालुका माध्यमिक शिक्षक संघ
ल्याचअनेक दिवसापासून माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे अनेक पदे रिक्त झाले आहेत. त्यामुळे उपलब्ध असणार्या अनेक शिक्षकांवर अतिरिक्त कामांचा ताण येत आहे. त्यातच निवडणूक तसेच बीएलओ कामकाजाचा अतिरिक्त ताण प्रशासनाने दिल्याने शैक्षणिक कामकाज करायचे कसे असा सवाल उपस्थित होत आहे.
- बाळासाहेब निवडुंगे, अध्यक्ष पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघ.
COMMENTS