रुबाब उद्योग समुह व घोडा टांगा संघटनेच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अहमदनगर । नगर सह्याद्री घोडागाडी, टांगा, बैलगाडी शर्यत यांना मोठी परंप...
रुबाब उद्योग समुह व घोडा टांगा संघटनेच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण
अहमदनगर । नगर सह्याद्री
घोडागाडी, टांगा, बैलगाडी शर्यत यांना मोठी परंपरा आहे, ही परंपरा आजही संघटना स्पर्धेच्या रुपात जतन करत आहे. स्पर्धेतील हार-जित महत्वाची नसून, यातून मिळणार सन्मान हा आनंद देणारा आहे. मध्यंतरी कोर्टाने यावर बंदी आणली होती, परंतु आता पुन्हा अशा स्पर्धा सुरु झाल्याने आयोजकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. अशा स्पर्धांसाठी रुबाब उद्योग समुहाने पुढाकार घेत केलेले सहकार्य अशा स्पर्धांना प्रोत्साहन देणारे आहे. हा उद्योग समुहा महाराष्ट्रासह इतर राज्यातही विस्तारात आहे, ही नगरकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. स्पर्धासाठी समुहाचे सहकार्य संघटनांना प्रोत्साहन देणारे असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
रुबाब उद्योग समुह व घोडा-टांगा संघटना अहमदनगर यांच्यावतीने आयोजित टांगा शर्यतीचे परितोषिक वितरण आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. खुल्या गटात सोनू बोरुडे यांना स्प्लेंडर प्लस दुचाकी व ट्रॉफी तर कुमार गटात मुन्ना बारस्कार यांना भव्य ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेवक किशोर डागवाले, निखिल वारे, दगडूमामा पवार, रुबाबचे सनी जाधव, मनोज लोंढे, शामभाऊ लोंढे, अक्षय जाधव, रोहित डागवाले, संतोष कोतकर, अंकुश काळे, संजय भुतकर, नगरे मामा, सागर सातपुते, समीर जहागिरदार, भैय्या दाणे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सनी जाधव म्हणाले, नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून घोडा-टांगा संघटनेच्यावतीने शर्यतीचे आयोजन करण्यात येत असते. ही स्पर्धां सर्वांनाच आनंद देणारी व उत्साह वाढविणारी आहे. अशा स्पर्धांसाठी प्रोत्साहन देण्यासाठी रुबाब उद्योग समुह नेहमीच पुढाकार घेईल, असे सांगितले.
यावेळी किशोर डागवाले म्हणाले, घोडा-टांगा शर्यत ही घोडाप्रेमीसाठी मोठी संधी असते. त्यामुळे उत्साह वाढविणारी ही स्पर्धा रुबाब उद्योग समुहाने प्रायोजित करुन महाराष्ट्राची परंपरा जपली आहे. अशा स्पर्धांसाठी इतरांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
ही स्पर्धा 16 कि.मी.भाळवणी ते नगर बायपायपर्यंत आयोजित करण्यात आली होती. यामधील कुमार गटात 13 स्पर्धक तर खुल्या गटात 16 स्पर्धेक सहभागी झाली होते. कुमार गटात : प्रथम - मुन्ना बारस्कर (सावेडी), द्वितीय - नानासाहेब गव्हाणे (वडगांवगुप्ता), तृतीय - दत्तात्रय गायकवाड (बोल्हेगांव). खुल्या गटात : प्रथम : सोनू पाटील बोरुडे (बोरुडेमळा), द्वितीय - शिवा बोरुडे (बोरुडे मळा), तृतीय - विलास जाधव (बुरुडगांव). विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.
COMMENTS