निकृष्ट काम सुरू असल्याची तक्रार पारनेर । नगर सह्याद्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पारनेर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक, त...
निकृष्ट काम सुरू असल्याची तक्रार
पारनेर । नगर सह्याद्री
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पारनेर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक, तहसील कार्यालय ते हिंद चौकपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरण काम निकृष्टपणे सुरू असल्याने संतप्त नगरसेवक, ग्रामस्थ यांनी गुरुवारी दुपारी काम बंद पाडले.पारनेर नगरपंचायतीचे नगरसेवक व तालिम संघाचे अध्यक्ष पैलवान युवराज पठारे, नगरसेवक राजू शेख, नवनाथ सोबले, ऋषिकेश गंधाडे, तुषार औटी, कांतीलाल ठाणगे, राजकुमार गांधी, सुहास औटी, गंगाराम ठुबे, सनी शिंदे, शंकर औटी, दत्ता औटी, बंटी ठुबे, नाना डोंगरे, मच्छिंद्र शिंदे, गोटू चेडे, आप्पा चेडे, अर्जुन शिंदे, संजय शिंदे यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामांचा जाब थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी विचारला. त्यानंतर हे काम चांगल्याप्रकारे केले जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे कामबंद आंदोलन शिवसेना नगरसेवक व कार्यकर्त्यांनी मागे घेतले.
पारनेर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकापासून तहसील कार्यालय समोरून हिंद चौक राळेगणसिद्धी रस्त्यापर्यंत रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या कामात डांबर वापरले जात नसून काम निकृष्ट होत असल्याचे नगरसेवक राजू शेख, पैलवान युवराज पठारे, नवनाथ सोबले, ऋषिकेश गंधाडे, तुषार औटी, कांतीलाल ठाणगे, राजकुमार गांधी, सुहास औटी, गंगाराम ठुबे, सनी शिंदे, शंकर औटी, दत्ता औटी, बंटी ठुबे, नाना डोंगरे, मच्छिंद्र शिंदे, गोटू चेडे, आप्पा चेडे, अर्जुन शिंदे, संजय शिंदे यांच्या लक्षात आले.त्यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना ही बाब सांगितली. त्यांनी काम सरकारी नियमाप्रमाणे सुरू असल्याचे सांगितले. अशा उत्तराने हे नगरसेवक संतप्त झाले. त्यांनी रस्त्याचे काम थांबवण्यास सांगितले. तहसीलदार शिवकुमार आवळकंठे यांच्याकडे जाऊन तक्रार केल्यावर तहसीलदार यांनी उपअभियंता तिकोळे यांना तातडीने याबाबत लक्ष देण्यास सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तिखोळे यांच्या दालनात चर्चा केल्यानंतर रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे दर्जेदार करून घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर काम सुरू करण्यात आले.
COMMENTS