अहमदनगर | नगर सह्याद्री कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असलेल्या युवकाला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. बुधवारी दुपारी बोल्हेगावच्या गणेश चौका...
अहमदनगर | नगर सह्याद्री
कॉलेज सुटल्यानंतर घरी जात असलेल्या युवकाला दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. बुधवारी दुपारी बोल्हेगावच्या गणेश चौकात ही घटना घडली. रितेश मच्छिंद्र कंठाळे (वय १७ रा. कातोरे वस्ती, बोल्हेगाव) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रतिक कांबळे व यश घाग (दोघांचे पूर्ण नावे माहिती नाही, रा. पितळे कॉलनी, नागापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितेश काकासाहेब म्हस्के माध्यमिक विद्यालयात बारावीच्या वर्गात शिक्षण घेतो. तो बुधवारी दुपारी कॉलेज संपल्यानंतर घराकडे जात असताना मागून दुचाकीवर आलेल्या प्रतिक व यशने त्याला गणेश चौकात अडवले. यशने लोखंडी कड्याने रितेशला मारहाण केली. प्रतिक व यश यांनी दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
COMMENTS