अहमदनगर | नगर सह्याद्री अहमदनगर शहरातील भिंगार कॅम्प पोलिसांनी राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्या टेम्पोवर कारवाई करू...
अहमदनगर | नगर सह्याद्री
अहमदनगर शहरातील भिंगार कॅम्प पोलिसांनी राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्या टेम्पोवर कारवाई करून तीघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टेम्पोसह तीन लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर-पुणे रोडवर एका टेम्पोमधून राज्यात बंदी असलेल्या सुगंधी सुपारी वाहतूक सुरू आहे. यामध्ये सुगंधी सुपारीचा मोठा साठा एका टेम्पोमध्ये घेऊन नगर शहरात विक्रीसाठी आणला जात आहे. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सफौ कैलास सोनार, पोहेकाँ अजय नगरे, पोहेकाँ विलास गारूडकर, पोना राहुल द्वारके, पोना राहुल गोरे, पोना भानूदास खेडकर यांनी नगर-पुणे रोडवर सापळा लावून संशयित जितो कंपनीचा टेम्पो (क्र. एमएच १६ सीडी २४११) याची तपासणी केली असता यामध्ये सुमारे २५ हजार रुपये किमतीची सुगंधी तंबाखू चोरून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले.
या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मनोहर अर्जुन खेडकर (वय ४२ वर्षे, रा. महेशनगर, नगर पाथर्डी रोड, अहमदनगर) सुशील बाळासाहेब केदार (वय २३ वर्षे रा. ए/१३, चाकन ऑईल मिलजवळ, नवनागापूर, अहमदनगर), सचिन डोंगरे (पुर्ण नाव माहीत नाही, रा. वडगाव गुप्ता ता. नगर) यांच्या विरूद्ध पोना भानूदास खेडकर यांनी गुन्हा दाखल केला. गुन्हाचा पुढील तपास पोहेकाँ गोपीनाथ गोर्डे करत आहेत.
COMMENTS