दिल्ली । नगर सह्याद्री - दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असतानाच दिल्ली आणखी एका धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत एकाच कुटुंबातील...
दिल्ली । नगर सह्याद्री -
दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असतानाच दिल्ली आणखी एका धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत एकाच कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरातील मुलानेच आपल्या वडिलांसह आजी आणि दोन बहिणींचा खून केला आहे. ही घटना राज नगर पार्ट-2 भागात घडल्याचे उघडकीस आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौघांचीही चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी या घटनेबाबत माहिती मिळाली आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेतले असून मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. पोलिसांनी मुख्य संशयित आरोपी असलेल्या मुलाला ताब्यातही घेतले आहे. सध्या त्याची कसून चौकशी सुरु आहे.
आरोपी मुलगा व्यसनाच्या आहारी गेलेला होता तो नुकताच व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडला असल्याचेही सांगण्यात येत आहे. पण घरी कुणाशीच त्याचे पटत नव्हते. घरात झालेल्या वादातूनच त्याने हे धक्कादायक कृत्य केले असावे, अशी भीती व्यक्त केली जात आहे. एकाच कुटुबांतील चार लोकांचा खून झाल्याने संपूर्ण दिल्ली हादरली आहे.
मृत व्यक्तींची नवे
४२ वर्षीय दिनेश कुमार, आरोपीचे वडील
दिवाणो देवी, आरोपीची आजी
आरोपीची आई दर्शन सैनी (४०)
उर्वशी, आरोपीची बहीण (२२)
COMMENTS