अहमदनगर । नगर सह्याद्री लंम्पीला प्रतिबंध घालण्यासाठी नगर तालुक्यातील खडकीत येथे औषध फवारणी करण्यात आली. दरम्यान बीडीओ श्रीकांत खरात, विस्...
अहमदनगर । नगर सह्याद्री
लंम्पीला प्रतिबंध घालण्यासाठी नगर तालुक्यातील खडकीत येथे औषध फवारणी करण्यात आली. दरम्यान बीडीओ श्रीकांत खरात, विस्तार अधिकारी रविंद्र माळी यांनी गावात भेट देऊन लंम्पी विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी सरपंच प्रविण कोठुळे, उपसरपंच अदिनाथ गायकवाड, ग्रामविकास अधिकारी अश्विनी बरबडे, भाऊसाहेब बहिरट, नवनाथ रोकडे, इन्नुस अत्तार, अशोक शिवाजी कोठुळे, मोहन कोठुळे, राजू उमाप आदी उपस्थित होते.
दरम्यान संतोष सदाशिव कोठुळे यांची गाय लंम्पी आजाराने मयत झाल्याने त्यांच्या घरी बीडीओ यांनी भेट देत मयत जनावराचा प्रस्ताव पंचायत समितीला प्राप्त झाला असून लवकरच त्यांची मदत मिळेल असे सांगितले.
COMMENTS