अहमदनगर फूटबॉल सुपर लीग स्पर्धा सीझन 2 मध्ये आरडीएक्स ज्युनियर्सला विजेतेपद अहमदनगर । नगर सह्याद्री नगर क्लबच्या मैदानावरील अहमदनगर फुटबॉल...
अहमदनगर फूटबॉल सुपर लीग स्पर्धा सीझन 2 मध्ये आरडीएक्स ज्युनियर्सला विजेतेपद
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर क्लबच्या मैदानावरील अहमदनगर फुटबॉल सुपर लीग सिझन 2 स्पर्धेत अंतिम सामन्यात चुरशीच्या लढतीत आरडीएक्स ज्युनियर्सने जेएमआर युनायटेड संघाचा पेनल्टी शूट आउटमध्ये पराभव करीत विजेतेपद पटकाविले. नियमित सामन्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केला. आरडीएक्स ज्युनियर्सकडून ओम आवारे तर जेएमआर युनायटेकडून श्रेयस लोट याने प्रत्येकी एक गोल केला. सामन्याचा निकाल पेनल्टी शूट आउटव्दारे लावला. यात आरडीएक्स ज्युनियर्स संघाने पाच पैकी पाच तर जेएमआर युनायटेडने पाच पैकी चार गोल केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण व्हिवा फुटबॉल मॅगिझनचे एक्झीक्युटिव्ह डायरेक्टर आशिष पेंडसे, महाराष्ट्र रिलायन्स फौंडेशनचे हेड स्काउट परेश शिवलकर, केंकरे फुटबॉल क्लबचे कुणाल सावंत, एडीएफएचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, उपाध्यक्ष अमरजितसिंग शाही, स्पर्धेच्या मुख्य आयोजक नमिता फिरोदिया यांच्या हस्ते झाले.
पेंडसे म्हणाले, फुटबॉल खेळ जगात लोकप्रिय आहे. यात संघभावना, नेतृत्वगुण, कौशल्य महत्वाचे असते. नगरमध्ये मोठ्या लीगच्या धर्तीवर अतिशय सुंदर स्पर्धा घेतली आहे. उदयोन्मुख खेळाडूंसाठी चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. नमिता फिरोदिया म्हणाल्या, अहमदनगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धा एक चांगले व्यासपीठ ठरली आहे. पंधरा वर्षाखालील गुणी खेळाडूंना नमोह फुटबॉल क्लब मोठ्या क्लबशी जोडण्याचा प्रयत्न करेल.
अहमदनगर फुटबॉल सुपर लीगची ट्रॉफी आरडीएक्स ज्युनियर्स संघाला देण्यात आली. एजीडब्ल्यू ग्रुपचे ऋत्विक वाबळे टिमचे स्पॉन्सरर होते. आरडीएक्स ज्युनियर्स संघात निरज धोका, हर्ष दास, सुजल खेडेकर, श्रावण पवार, आर्यन खान, मोहंमद अरफान, ओम गोरखा, रणवीर म्हस्के, आदित्य घुले, ओम आवारे, तरण फिरोदिया यांनी उत्कृष्ट खेळ केला. उपविजेत्या जेएमआर युनायटेड टिममध्ये यदुवर कोकरे, कुश चौधरी, सिध्देश्वर देशमुख, रोनक कुदळे, श्रेयस लोट, वरद हिरे, श्रुती पवार, शिवांश बरमेचा, रज्जाक मोमीन, ओम जाधव, प्रणित जाधव, साहिल घाडगे यांचा समावेश होता.
स्पर्धेत बेस्ट गोलकिपर म्हणून जेएमआर युनायटेडचा यदुवर कोकरे, बेस्ट डिफेन्स कुश चौधरी, टॉप गोलकिपर व बेस्ट प्लेयर म्हणून आरडीएक्स ज्युनियर्सचा हर्ष दास याला सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमावेळी कोच रोहन कुकरेजा, सौरभ चव्हाण, अभिषेक सोनवणे, ऋषी पाटोळे, वेदांत पाठक, मनिषसिंग राठोर, सुमितसिंग राठोर, सुशिल लोट उपस्थित होते. बेस्ट टिम प्लेयर म्हणून पदमेश वायभासे, पार्थ मस्कर, सक्षम कोपनर, मोहंमद मिर्झा, रोहित बुगलिया, अमर शेख, कुश चौधरी, हर्ष दास यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमास संघ मालक, स्पॉन्सरर, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS