सुरेगाव पायी दिंडीचे भोयरे गांगर्डातून आळंदीकडे प्रस्थान सुपा | नगर सह्याद्री श्री क्षेत्र सुरेगाव ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा ...
सुरेगाव पायी दिंडीचे भोयरे गांगर्डातून आळंदीकडे प्रस्थान
सुपा | नगर सह्याद्री
श्री क्षेत्र सुरेगाव ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळा गेली २१ वर्षापासून अविरत पणे सुरू असून याचे सर्वात मोठे श्रेय दिंडी चालक हभप पोपट महाराज नरोडे यांना जाते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचे चिरंजिव महेश महाराज नरोडे यांची गेली अनेक वर्षापासून आळंदी येथे संस्था आहे. त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. ही संस्था अविरतपणे चालू ठेवण्यास ते सक्षम आहेत. आजही ही संस्था अनेक विद्यार्थांना घडविण्याचे काम करते् यांची सेवा ही निस्वार्थी आहे असे हभप प्रमोद महाराज काळे यांनी आपली किर्तनरूपी सेवा देताना सांगितले.
सोमवार दि.१४ रोजी पायी दिंडी सोहळ्याचे भोयरे गांगर्डा येथे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दिंडीचा पहिला मुक्काम माजी सरपंच भामाबाई भैय्यासाहेब रसाळ रसाळ यांच्या निवासस्थानी होता. सायंकाळी ७ ते ९ हभप प्रमोद महाराज आळंदीकर यांचे भाविकांच्या उपस्थितीत जाही हरीकिर्तन सोहळा पार पडला.
यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या दिंडी सोहळ्यात सुरेगाव, सारोळासोमवंशी, कोरेगव्हाण, खरातवाडी, चांभुर्डी, वाळवणे, जातेगाव, गटेवाडी, वाघुंडे, भोयरे गांगर्डा, कडूस, पाडळी रांजणगाव, देवदैठण, शिरूर, गणपती रांजणगाव, शिक्रापूर, बहुळ येथील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात.आनंदाश्रम स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र सुरेगाव ते श्री क्षेत्र आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे मंगळवार दि.१५ रोजी सकाळी ७ वाजता भोयरे गांगर्डातून आळंदीकडे प्रस्थान झाले. हभप पोपट महाराज नरोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे हे २१ वे वर्ष आहे.यावेळी हभप मधुकर महाराज लगड, पोपट भोगाडे, सुभाष भोगाडे, माजी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, दादासाहेब रसाळ, सुखदेव गांगड, संजय पवार, आप्पासाहेब रसाळ, महादेव भोगाडे, किशोर रसाळ, राजेंद्र दरेकर, सुदाम पवार, गणेश रसाळ, बाळासाहेब सातपुते, शरद पवार, राजेंद्र रसाळ, रघुनाथ रसाळ, सागर रसाळ, सुभाष रसाळ, सौरभ रसाळ, बाळासाहेब भोगाडे, विठ्ठल रसाळ, बाळासाहेब पवार, दादासाहेब जवक, विजय पवार, सोमनाथ तरटे, ओंकार रसाळ, रविंद्र भोगाडे यांच्यासह दिंडीतील वारकरी, महीला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा दिंडी सोहळा भोयरे गांगर्डा, शिरूर, रांजणगाव गणपती, शिक्रापूर, बहुळ मार्गे श्री क्षेत्र आळंदी येथे दाखल होणार असून दिंडीचा अखेरचा मुक्काम श्री.शहाजीराव थोरवे आण्णा ठाकरवाडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगांव रोड आळंदी येथे होणार आहे.
COMMENTS