अहमदनगर । नगर सह्याद्री नावीन्यपूर्ण डिझाईन्ससाठी सुप्रसिध्द असलेल्या चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स् प्रायव्हेट लिमिटेड यांनी विवाहाच्या खास दाग...
अहमदनगर । नगर सह्याद्री
नावीन्यपूर्ण डिझाईन्ससाठी सुप्रसिध्द असलेल्या चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स् प्रायव्हेट लिमिटेड यांनी विवाहाच्या खास दागिन्यांचे विंटर वेडिंग कलेक्शन’ सादर केले आहे. लग्नसमारंभामध्ये आजच्या काळातील नववधूसाठी असंख्य मनमोहक व सुंदर डिझाईन्सची ही श्रेणी आता उपलब्ध झालेली आहे. या कलेक्शनमध्ये विविध प्रकारचे खास सेट तयार करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये सोने, कल्चर्ड मोती, प्रेशियस स्टोन्सचा वापर करण्यात आलेला आहे. या सेटमध्ये हेरिटेज किंवा वारसा ही थीम वापरण्यात आली असून यातून खानदानी सौंदर्य प्रकट करणारी कलाकुसर करण्यात आलेली आहे. यामध्येच वैविध्य निर्माण करताना छोटा हार, लांब मंगळसूत्र आणि मिनी लाँग हारची निर्मिती करताना त्यात फुलांचा डाय पीस आणि निळ्या व लाल रंगाचे अनोखे कॉम्बिनेशन साधण्यात आले आहे. नववधूसाठी बांगड्या घडवितानाही खास कलाकृती ठरेल असे कोरीव व मोहक काम करण्यात आले आहे. या वधूच्या सेट्समध्ये हेरिटेज लूक महत्त्वाचा आहे, जे एकत्र किंवा वेगळे घालण्यासाठी खूप छान आहेत, मेहेंदी समारंभासारख्या छोट्या लग्नसमारंभासाठी देखील या एकत्र किंवा सेपरेट वेअर करु शकतो. या सेट्सचे वैशिष्ट्य म्हणजे ते वजनाने हलके आहे आणि तरीही वारसा/हेरिटेज कन्सेप्टनुसार ते पारंपारिक आणि भारतीय संस्कृतीला अनुसरून घडविण्यात आलेले आहेत.
याचबरोबर डायमंड नेकलेसमध्येही आकर्षक डिझाईन्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ब्रायडल रेंजमध्ये डायमंड नेकलेस सेट दीड लाखांपासून सुरू होतात आणि डायमंड तन्मणी 50,000/- पासून सुरू होतात. या विंटर वेडिंग कलेक्शनमध्ये खास वाटी तन्मणी डिझाइनमध्ये विशेष श्रेणीत तयार करण्यात आली आहे. यातील बांगड्यांची रेंज 1 लाख 80 हजार पासून सुरू होते. या डायमंड सेट्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे कलर स्टोन्ससह डायमंड असलेले सेट्स. पण यासोबत प्लेन डायमंड सेटही आहेत. नेकलेसमध्ये पारंपारिक, स्ट्रिंग, ब्राइडल, कॉकटेल,बस्ट्रॅक्ट,लेयर्ड असे विविध प्रकार सादर करण्यात आले आहे. सर्व सेटमध्ये ग्राहकांच्या पसंतीनुसार युनिक फुलांचा आणि बस्ट्रॅक्ट एलिमेंट्सचा वापर करण्यात आलेला आहे. हे कलर स्टोन आणि डायमंड सेट हे ट्रेंडसेटर ठरणारे आहेत.
विंटर वेडिंग कलेक्शन’ चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स् यांच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील सर्व शोरूम्स् मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळेच, तुमच्या घरात जर लग्नकार्य ठरले असेल तर दागिने खरेदीसाठी विंटर वेडिंग कलेक्शन’ पाहायला, चंदुकाका सराफ अॅन्ड सन्स् प्रायव्हेट लिमिटेड च्या आपल्या जवळच्या शाखेला लवकर भेट द्या असे आवाहन चंदुकाका सराफ अॅन्ड सन्सचे चेअरमन किशोरकुमार शहा यांनी केले आहे.
COMMENTS