महापालिका आयुक्तांना निवेदन अहमदनगर । नगर सह्याद्री - नगर शहरातील पाईपलाईन रोडसह औरंगाबाद रोड नामदेव चौक ते श्रीराम चौक ते मनमाड रोड या रस्...
महापालिका आयुक्तांना निवेदन
अहमदनगर । नगर सह्याद्री -
नगर शहरातील पाईपलाईन रोडसह औरंगाबाद रोड नामदेव चौक ते श्रीराम चौक ते मनमाड रोड या रस्त्याचे काम कोट्यावधी रुपये खर्चूनही अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या कामाबाबत माहिती अधिकारात माहिती मागूनही ती देण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. महापालिकेतील प्रशासकीय अधिकारी मनमानी करत असून केवळ ठेकेदारांची घरे भरण्याचे प्रकार सध्या सुरू आहे. शहरातील जनता दररोज खड्ड्यातून प्रवास करते. मात्र प्रशासनाला त्याच्याशी काही देणे घेणे राहिलेले नाही. सदर रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित जोशींवर कडक कारवाई करावी अन्यथा महापालिकेत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.
पाईपलाईन रोड सह इतर रस्त्यांच्या निकृष्ट कामासंदर्भात माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी महापालिका आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी युवा सेनेचे नेते विक्रम राठोड, गिरीश जाधव, नगरसेवक अमोल येवले, प्राध्यापक अंबादास शिंदे, स्मिता अष्टेकर आदी उपस्थित होते. शहरातील पाईपलाईन रोड सह नामदेव चौक ते श्रीराम चौक ते औरंगाबाद रोड पर्यंतचा रस्ता तीन कोटी सत्तर लाख रुपये खर्च करून नुकतेच करण्यात आले.
सदरचे काम निविदेतील अटीशतीप्रमाणे झालेले नाही. त्यात प्रचंड तफावत दिसून येत आहे. सदर कामात जनतेची फसवणूक करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. या कामाबाबत महापालिकेकडून माहिती अधिकारात माहिती दिली जात नाही. नगरची जनता महापालिका कर भरते मात्र जनतेला चांगले रस्ते मिळत नाही. त्यांना खड्डेतूनच प्रवास करावा लागतो. ज्या रस्त्यांची कामे झालीत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. कामांची बिले काढून ठेकेदारांची घरे भरण्याचे प्रकार सध्या सुरू आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामाची येत्या आठ दिवसात चौकशी करावी त्यात दोषी आढळल्यावर कारवाई करावी तसेच माहिती न देणार्या अधिकार्यावर कारवाई करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कळमकर यांनी दिला आहे. तसेच या भ्रष्टाचाराबाबत मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
COMMENTS