मुंबई । नगर सह्याद्री - जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद सुरु असताना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही...
मुंबई । नगर सह्याद्री -
जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद सुरु असताना आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत बोम्मईंनी हा दावा केला आहे. 'कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावे, अशी आमची मागणी आहे. असे बोम्मई म्हणाले आहे.
याशिवाय त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केले असून त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. राज्याची जमीन, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध असल्याचे बोम्मई म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरसह राज्यभरात संताप व्यक्त केला जातो आहे.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ४० गावे कर्नाटकात सामील होतील, असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला होता. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा करण्याच्या तयारीत आम्ही आहोत. या मुद्द्यावर आम्ही गांभीर्याने विचार करत आहोत, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यांनंतर आता बोम्मईंनी आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्मईंना यांना याअगोदरच प्रत्युत्तर दिले होते.
महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही, असे सणसणीत उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बसवराज बोम्मई यांना दिले होते. ज्या ठरावाचा उल्लेख बोम्मई यांनी केला आहे. तो ठराव 2012 साली केला होता. त्यानंतर कुणीही अशा प्रकारची मागणी केली नाही. असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही !बेळगाव-कारवार-निपाणीसह मराठी भाषिकांची गावे मिळविण्यासाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे लढा देईल !#Maharashtra pic.twitter.com/0sB1IIpIQA— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 23, 2022
संजय राऊतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ४० गावे ताब्यात घेणार असल्याच्या वक्तव्यावरुन राऊतांनी भाजपवर निशाणा साधला आहे. हे मिंधे सरकार आहे. हे कमजोर सरकार आहे मात्र, आम्ही महाराष्ट्रासाठी लढत राहू असह राऊत म्हणाले आहे.
ಕರ್ನಾಟಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಗಡಿ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಉಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ದೇವೇದ್ರ ಫಡ್ನವಿಸ್ ಅವರು ಪ್ರಚೋದನಕಾರಿ ಹೇಳಿಕೆ ನೀಡಿದ್ದು, ಅವರ ಕನಸು ಎಂದೂ ನನಸಾಗುವುದಿಲ್ಲ. ನಾಡಿನ ನೆಲ, ಜಲ, ಗಡಿ ರಕ್ಷಣೆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಕಟಿ ಬದ್ಧವಾಗಿದೆ.1/3— Basavaraj S Bommai (@BSBommai) November 23, 2022
COMMENTS