वाडेगव्हाणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सुपा / नगर सह्याद्री जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्की म...
वाडेगव्हाणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
सुपा / नगर सह्याद्री
जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल असे प्रतिपादन पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी केले. ते पारनेर तालुक्यातील मावळेवाडी येथिल स्पर्धां परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
मावळेवाडी येथिल महेश नानासाहेब पठारे व सागर यशवंत कदम यांनी एम पी एस सी परिक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन मंत्रालयात [ ए ए सओ ] झाले आहे या निमित्त मावळेवाडी ग्रामस्थांनी गावातील प्रथमच उच्च अधिकारी होणारे युवकांचा तसेच निवृत्त अधिकारी यांचा सत्कार सभारंभ आयोजित केला होता.
आमदार लंके पुढे म्हणाले की, मावळेवाडी गाव आज खऱ्या अर्थाने पुढे आले असून तरुण युवकांनी सकारात्मक विचार जिद्द सयंम व चिकाटी ठेवल्यास यश नक्की मिळते स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थ्यांंना कोणतेही मदत करण्याचे आश्वासन यावेळी आमदार निलेश लंके यांनी दिले. यावेळी महाराष्ट्र पोलिस दिपक पठारे, ॲड. निलकंठ कुलाळ, ॲड. झिटे निवृत्त, ग्रामविकास अधिकारी भास्कर कुरकुटे, निवृत्त मेजर, सतिश कुरकुटे, निवृत्त पाटबंधारे विभागाचे कर्मचारी बाळासाहेब कदम यांचाही सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती सुदाम पवार, पोलिस उपनिरिक्षक तुषार भोर, सी ए गाडगे, ग्रामभूषण नानासाहेब पठारे, जातेगावचे सरपंच विठ्ठल पोटघन, माजी सरपंच नानाभाऊ कुरकुटे, मावळेवाडीचे सरपंच उदय कुरकुटे, उपसरपंच गणेश पठारे, प्रा. संतोष खोडदे, उद्योजक कांतीलाल भोसले, बाळा ब्राम्हणे, जयवंत कुरकुटे, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत भोसले, चेअरमन दत्ता पठारे, सुरेश कलाप , लोभाजी मावळे, रवी पठारे , बाळासाहेब कुरकुटे, रविंद्र पाडळकर, शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, नामदेव कदम, बाजीराव चहाळ, सुदाम कलाप, निखिल शेळके, रंगनाथ कुरकुटे, भरत गव्हाणे, बाबासाहेब पठारे, मावळेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर दक्षिणची जबाबदारी माझ्याकडेच!
खोक्यामुळे माझा आवाज थोडा कमी झाला असला तरी लवकरच तो वाढेल असे मिस्किलीने आमदार लंके यांनी म्हणटल्यावर एकच हश्या झाला तसेच नगर दक्षिणची जबाबदारी माझ्याकडेच असल्याचे आमदार निलेश लंके यांनी यावेळी सांगितले
COMMENTS