सुपा | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील पाडळी रांजणगाव येथे विकासकामांची मालिका सतत सुरूच असून ही विकासकामे करण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहो...
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुयातील पाडळी रांजणगाव येथे विकासकामांची मालिका सतत सुरूच असून ही विकासकामे करण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत असे प्रतिपादन पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर जनसुविधा योजनेतून पेव्हर ब्लॉक बसवणे या कामाचा सुभारंभ प्रसंगी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच वैशाली करंजुले होत्या.ग्रामपंचायत पाडळी रांजणगाव च्या मागणीनुसार आमदार निलेशजी लंके व जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके यांनी सदर कामासाठी रुपये ५ लक्ष इतका निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानले. ग्रामपंचायत पाडळी रांजणगाव च्या मागणीनुसार आमदार नीलेश लंके व जिल्हा परिषद सदस्या राणी लंके यांच्या शिफारशीने जनसुविधा योजनेतून मंजूर मारुती मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसवणे (५ लक्ष )या कामाचा शुभारंभ करतांना हभप नरोडे महाराज, सरपंच विक्रमसिंह कळमकर यांच्या हास्ते करण्यात आला.यावेळी चेअरमन डी. बी. (अण्णा) करंजुले, तंटामुक्ती अध्यक्ष अप्पासाहेब साठे, व्हा. चेअरमन अप्पासाहेब कळमकर, जेष्ठ मार्गदर्शक विठ्ठलराव साठे,किरणराव साठे, कांतीलाल उबाळे, अरुणराव उबाळे,रमेश उबाळे, शहाजी करंजुले, सोनबा पाटील, कांतीलाल करंजुले, लतेश करंजुले, हरिभाऊ उबाळे, माधव जाधव,शांताराम साठे, सुनील उबाळे,अनिल उघडे आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS