आसाममधील नागाव जिल्ह्यात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला.

आसाममधील नागाव जिल्ह्यात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना आसामच्या कालियाबोर उपविभागांतर्गत हातिखुआ भागात राष्ट्रीय महामार्ग-३७ वर सोमवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोकाखातहून तेजपूरच्या दिशेने येणाऱ्या पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. बिबेक दास, संजय दास, समीर पॉल, विकास सरमा आणि संदीप पॉल अशी मृतांची नावे आहेत.
चुलुंग पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी मृदुल देबनाथ यांनी सांगितले की, हातिखुआ चारियाली भागात अपघात झाल्याची माहिती आम्हाला मिळताच आम्ही घटनास्थळी पोहोचलो. बोकाखत बाजूकडून कार येत होती तर विरुद्ध दिशेने ट्रक येत होता. कारमधील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला.
COMMENTS