पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील अमोल सरडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतून राज्य कर निर...
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील अमोल सरडे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेतून राज्य कर निरीक्षक पदावर निवड झाली आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यासातील सातत्य व जिद्दीच्या बळावर अमोलने हे यश मिळवले आहे. अमोलचे हे यश परिसरातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच दिशादर्शक ठरणार आहे. त्याने मिळवलेल्या या यशाबद्दल बाबासाहेब रोहोकले, दत्तात्रय काळे व ग्रामस्थ भाळवणी यांच्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
COMMENTS