मुंबई : तेलुगू सुपरस्टार ज्याने मपुष्पा: द राइजफमधून देशभरातील चाहत्यांची मनं जिंकली त्या अभिनेता अल्लू अर्जुनने (-श्रर्श्री -ीर्क्षीप छशुी)...
मुंबई: तेलुगू सुपरस्टार ज्याने मपुष्पा: द राइजफमधून देशभरातील चाहत्यांची मनं जिंकली त्या अभिनेता अल्लू अर्जुनने (-श्रर्श्री -ीर्क्षीप छशुी) पुन्हा एकदा त्याचं मोठं मन सर्वांना दाखवून दिलं आहे. अभिनेत्याने केरळमधील एका मुलीच्या शिक्षणाचा भार उचलण्याचा निर्णय घेतला आहे, जिची आर्थिक स्थिती फारशी व्यवस्थित नव्हती. या मुलीच्या चार वर्षांच्या नर्सिंग कोर्सचा सर्व खर्च अभिनेता अल्लू अर्जुन करणार आहे.गुरुवारी, केरळमधील अलप्पुझाचे जिल्हाधिकारी व्हीआर कृष्णा तेजा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याविषयी माहिती दिली. अभिनेत्याच्या दयाळू स्वभावाबाबत त्यांनी कौतुक करत त्याचे आभार मानले. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये, जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, नर्सिंगचे शिक्षण घेणार असणार्या त्या विद्यार्थिनीच्या वडिलांचा गेल्या वर्षी कोविडमुळे मृत्यू झाला. तिने इंटरमिजिएट परीक्षेत ९२ टक्के गुण मिळवले होते, पण आर्थिक अडचणींमुळे ती तिचा अभ्यास सुरू ठेवू शकली नाही.-ऊत- किड्स कार्निवल स्टोअर - तुम्हाला तुमच्या मुलांची खोली, शाळा आणि छंद यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट मवी आर फॉर अलेप्पीफ प्रोजेटचा भाग म्हणून, त्यांनी मॅनेजमेंट सीटसाठी अनेक कॉलेजांशी संपर्क साधला कारण मेरिट सीटसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत संपली होती. शेवटी तिला जिल्ह्यातील एका खाजगी महाविद्यालयात (सेंट थॉमस नर्सिंग कॉलेज, कट्टनम) प्रवेश मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. तिच्या आर्थिक भार उचलण्याची जबाबदारी अल्लूने उचलली.
COMMENTS