भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही - शहरप्रमुख संभाजी कदम अहमदनगर / नगर सह्याद्री - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी...
भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही - शहरप्रमुख संभाजी कदम
अहमदनगर / नगर सह्याद्री -
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात नगर शहर शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करुन प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांचाही निषेध करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोक गायकवाड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, शाम नळकांडे, संतोष गेनप्पा, परेश लोखंडे, सुरेश तिवारी, संदिप दातरंगे, विष्णू घुले, ज्येम्स आल्हाट, संजय आव्हाड, अभिजित अष्टेकर, पप्पू भाले आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.
याप्रसंगी संभाजी कदम म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर जगाचे दैवत आहे, अशा महान व्यक्तींबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य करुन राज्यपाल कोश्यारी यांनी तमाम महाराष्ट्राचाच अपमान केला आहे. नेहमीच राष्ट्र पुरुषाबद्दल बेताल वक्तव्य करण्यात ते धन्यता मानत आहेत. अशा राज्यपालांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. त्यांना या पदावर काढून महाराष्ट्रा बाहेर हकलून दिले पाहिजे. तसेच सुधांशू त्रिवेदी यांनीही जे वक्तव्य केले, त्याचा निषेध करुन त्यांच्यावर भाजपाने कारवाई करावी, अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही संभाजी कदम यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर बाळासाहेब बोराटे, अशोक गायकवाड आदिंनी राज्यपालांच्या वक्तव्यांचा निषेध व्यक्त करुन अशा घटना पुन्हा घडणार नाही, यांची दक्षता घ्यावी, अन्यथा वंदनिय व्यक्तींचा अपमान करणार्यांना कायमचा धडा शिकवू, असे सांगितले. यावेळी शिवैनिकांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशू त्रिवेदी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
COMMENTS