दोघांवर कारवाई । दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट अहमदनगर । नगर सह्याद्री नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाक...
दोघांवर कारवाई । दीड लाखांचा मुद्देमाल नष्ट
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी ठिकाणांवर छापे टाकुन दोन आरोपींविरुध्द कारवाई करण्यात आली. तसेच 1 लाख 55 हजार रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने 2,800 लि. कच्चे रसायन व 150 लिटर तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली.
या कारवाईत युवराज बजरंग गिर्हे, गणेश पोपट गिर्हे (दोघे राहणार खंडाळा, ता. नगर) यांच्यावर कारवाई केली
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार सफौ मनोहर शेजवळ, बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, रवि सोनटक्के, विशाल दळवी, राहुल सोळंके, पोकों रोहित येमुल, आकाश काळे, सागर ससाणे,व चापोहेकॉ बबन बेरड यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी नगर तालुका पोलीस स्टेशन हद्यीमध्ये 23 नोव्हेंबर 2022 रोजी कारवाईची विशेष मोहिम राबविली. दोन ठिकाणी छापे टाकुन एकुण 1 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे 2,800 लिटर कच्चे रसायन, 150 लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त करुन नष्ट केली.
COMMENTS