नगर क्लब मैदानावर अहमदनगर फूटबॉल सुपर लीग स्पर्धा सीझन 2 चे शानदार उद्घाटन अहमदनगर । नगर सह्याद्री नगरला खेळाची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्...
नगर क्लब मैदानावर अहमदनगर फूटबॉल सुपर लीग स्पर्धा सीझन 2 चे शानदार उद्घाटन
अहमदनगर । नगर सह्याद्री
नगरला खेळाची मोठी परंपरा आहे. अनेक दिग्गज क्रीडापटू या मातीत घडले आहेत. कोणत्याही शहराची कला क्रीडा संस्कृती शहराला एक चांगली ओळख निर्माण करून देते् नमोह फुटबॉल क्लब अशाच उदात्त हेतूने सातत्याने दर्जेदार फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करत आहे. यातून प्रत्येकाला खेळाचा निखळ आनंद मिळतो. तसेच फिटनेस प्रती जागृती होते. मोठ्या महानगराप्रमाणे अतिशय सुंदर नियोजन असलेल्या स्पर्धा नमोह फुटबॉल क्लब घेत आहे ही अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले.
नमोह क्लबच्यावतीने शहरात दि. 12व 13 नोव्हेंबर रोजी भव्यदिव्य अहमदनगर फूटबॉल सुपर लीग स्पर्धा सीझन 2 चे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर क्लबच्या मैदानावर मोठ्या फूटबॉल लीगच्या धर्तीवर होणार्या या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हवेत फुगे सोडून करण्यात आले. यावेळी सौ. दीपाली भोसले, सौ.मिनल पाटील, छायाताई फिरोदिया, ललिता फिरोदिया, आशाताई फिरोदिया, विक्रम फिरोदिया, नमिता फिरोदिया, कलिम मर्चंट, किट स्पॉन्सरर राजेंद्र घुले (फार्मा स्पोर्ट्स), केतन क्षीरसागर (रामकृष्ण इंफ्रास्ट्रक्चर), टीम स्पॉन्सरर कमू कॉन्करर्स (टाटा मॅक्स- युनिट ऑफ कराचीवाला), (प्रभू कराचीवाला), जेएमआर युनायटेड ( जेएमआर कन्स्ट्रक्शन),(ओंकार म्हसे) अवित्री स्ट्राईकर्स (अवित्री बाईक्स ), ( अभिनंदन भन्साळी), जीसी फायटर्स ( गुलाबचंद कारपेटवाला), ( दर्शन भंडारी), प्रिया पँथर्स (प्रिया ड्रेसेस),(धीरज मुनोत), एसजीके गोल्ड स्टार्स ( एस.जी. कायगांवकर), (सागर कायगांवकर ),आयुर्वेदा अव्हेंजर्स, (श्री कमला आयुर्वेदिक हॉस्पिटल),(डॉ. महेश मुळे), आरडीएक्स ज्युनिअर्स (एजीडब्ल्यू ग्रुप)् (ऋत्विक वाबळे ) आदी उपस्थित होते.
स्वागत करताना नमिता फिरोदिया यांनी सांगितले की, स्पर्धेतून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. पंधरा वर्षाखालील खेळाडूंना यात सहभागी करुन घेण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंमधून संघ निवड करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी सुरुची मसाला यांचे सहकार्य लाभले आहे. प्रत्येक संघातील खेळाडूंना तज्ज्ञांमार्फत 10 ते 15 दिवसांचे प्रशिक्षणही दिले असून
नगरच्या क्रीडा विश्वाला चालना देण्यासाठी नमोह फौंडेशनने नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. फूटबॉलमध्ये नगरमध्ये अनेक गुणी खेळाडू तयार होत आहेत. त्यांच्यासाठी ही सुपर लीग चांगले व्यासपीठ ठरणार आहे. 9 अ साईड पध्दतीने बाद फेरीचे सामने होणार आहेत. प्रत्येक सामना 30 मिनिटांचा असेल. स्पर्धेसाठी लर्निंग पार्टनर आरोही क्लासेस असून मेडिकल पार्टनर पंडित हॉस्पिटल तर सह प्रायोजक राम एजन्सी व चंदे बेकर्स आहेत. स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. शुभारंभ प्रसंगी स्पॉन्सर व टीम ओनर यांच्यात पेनल्टी शूट आऊटने झाला.
COMMENTS