अहमदनगर । नगर सह्याद्री चारचाकी वाहनातून (एमएच 23 एएस 3044) आलेल्या व्यक्तीकडे अल्पवयीन मुलीने पत्ता विचारला असता त्या वाहनातील व्यक्तीने...
अहमदनगर । नगर सह्याद्री
चारचाकी वाहनातून (एमएच 23 एएस 3044) आलेल्या व्यक्तीकडे अल्पवयीन मुलीने पत्ता विचारला असता त्या वाहनातील व्यक्तीने मुलीसोबत गैरवर्तन केल्याची घटना शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास नगर शहरातील एका उपनगरात घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात वाहनातील अनोळखी चालकाविरूद्ध विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
नगर शहरात राहणार्या पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की फिर्यादी व त्यांची अल्पवयीन मुलगी रस्त्याने पायी जात होत्या. उपनगरातील मोकळ्या मैदानाजवळ मुलीचे दात दुखत असल्याने फिर्यादी या तिच्यासाठी गोळ्या घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेल्या होत्या. त्याच दरम्यान पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या व्यक्तीकडे फिर्यादीच्या मुलीने एका ठिकाणी जाण्यासाठी पत्ता विचारला.
त्या व्यक्तीने मुलीच्या पाठीवर हात फिरवून, चल तू गाडीत बस तुला सोडवतो, असे बोलून मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर करीत आहेत.
COMMENTS