अहमदनगर / नगर सह्याद्री - - केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे भाजपाचे दिग्गज नेते नगर शहराच्या दौर्...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
- केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे भाजपाचे दिग्गज नेते नगर शहराच्या दौर्यावर येत आहेत.
गुरुवारी (दि. 17) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नव्या रेल्वे गाडीला नगरच्या रेल्वे स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. नव्याने सुरु झालेल्या नगर-बीड रेल्वे मार्गावरील प्रवाशांना आता थेट मुंबईला जाता येणार आहे. यासाठी नगरमधून जाणार्या रेल्वेला नगर-बीड गाडीचे डबे जोडण्यात येणार आहेत. शनिवारी (दि. 19) शहरातील प्रत्येक नागरिकाच्या जिव्हाळ्याच्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिमाखदार सोहळ्याने होणार आहे. या तिन्ही महत्वाच्या कार्याक्रमाचे नियोजन सर्व पदाधिकारी करत आहेत. शहरतील सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी समर्थकांसह या तिन्ही कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केले आहे.
17 व 19 नोव्हेंबरला होणार्या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी सावेडी येथील संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत महेंद्र गंधे बोलत होते. खासदार डॉ. सुजय विखे यावेळी उपस्थित होते. माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्यासह नगरसेवक, शहर भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. उड्डाणपूलाचा प्रकल्प वेगाने पूर्णत्वास नेल्याबद्दल शहर भाजपच्या वतीने खा. सुजय विखे यांचे महेंद्र गंधे यांनी अभिनंदन केले.उड्डाणणपूलाच्या लोकार्पण सोहळ्याची माहिती देताना खा. सुजय विखे म्हणाले, नगर शहरात उड्डाणपूल होण्यासाठी माजी खासदार स्व. दिलीप गांधी, माजी आमदार स्व. अनिल राठोड यांचे मोठे योगदान आहे. त्याच बरोबर शहरातील अनेक नागरिकांचे, पक्षाच्या पदाधिकार्यांचे कोणत्याना कोणत्या स्वरुपात श्रेय आहेच. उड्डाणपूल शहर विकासाचा केंद्रबिंदू आहे.
येणार्या निवडणुकांमधून या उड्डाणपूलाचा लाभ पक्षाला दिसेल. शनिवारी दुपारी 2:30 वाजता केंद्रीय मंत्री गडकरींचे आगमन नगर शहरात होईल. त्यांना 4 वाजेच्या आत परत जायचे असल्याने अत्यंत सुटसुटीत लोकार्पण सोहळा होणार आहे. स्वतः गडकरी उड्डाणपुलावर न जाता उद्घाटन करणार आहेत. पुणे रोडवरील शिल्पा गार्डन येथे यानिमित्त जाहीर कार्यक्रम होणार आहे. यासाठी शहरतील पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना पास देण्यात येणार आहेत.
याच दिवशी संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान नव्या उड्डाणपूलावर साउंड, लाईट, लेझर शो व आतिषबाजी अशा भव्यदिव्य कार्याक्रमचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना उड्डाणपुलावर न जाता हा शो पाहता यावा, अशी सोय करण्यात आली आहे. या शो नंतर सर्व नागरिकांसाठी हा उड्डाणपूल खुला करण्यात येईल. बैठकीचे प्रास्ताविक संघटन सरचिटणीस विवेक नाईक यांनी केले. सुवेंद्र गांधी, नरेंद्र कुलकर्णी यांनी यावेळी विविध विषय मांडले. सरचिटणीस महेश नामदे यांनी आभार मानले.
COMMENTS