अहमदनगर । नगर सह्याद्री अनाथालयातील तरूणीवर शिर्डी येथे झालेल्या अत्याचार प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली असून त्यांना न...
अहमदनगर । नगर सह्याद्री
अनाथालयातील तरूणीवर शिर्डी येथे झालेल्या अत्याचार प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन तरूणांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान पोलिसांकडून तपासाबाबत गोपनीयता बाळगली जात असून, अटक आरोपींचे नावे सांगण्यात नकार दिला आहे.
नगर शहरातील एका अनाथालयात राहत असलेली तरूणी रागाच्या भरात शिर्डीला निघून गेली होती. तिच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केला. या तरूणीवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना तिने दिलेल्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री सामुहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्ष्यात येता पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक यांनी मुळचे जळगाव जिल्ह्यातील व सध्या शिर्डीत वास्तव्यास असलेल्या दोन तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनी घटनेची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने 23 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
COMMENTS