मुंबई । नगर सह्याद्री - मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे प्रकृती खालावल्यामुळे काल रुग्णालयात दाखल झाले आहे...
मुंबई । नगर सह्याद्री -
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे प्रकृती खालावल्यामुळे काल रुग्णालयात दाखल झाले आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ते 77 वर्षांचे आहे. गत 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात दाखल आहे. मात्र, आता त्यांची तब्येत खालावल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, त्यांचे निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर त्यांच्या मुलीने या अफवाचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. तसेच त्यांच्यावर व्हेंटीलेटवर उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान, गोखले यांच्या कुटुंबाचे निकटवर्तीय राजेश दामले यांनी सकाळी 11 वाजता माध्यमांना सांगितले की, अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन दामले यांनी केले आहे.
COMMENTS