मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होत...
मुंबई : मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यामुळे तिच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर सध्या ती सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहे.
यातील बहुतांश पोस्ट या तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित असल्याचे बोललं जात आहे. मात्र नुकतंच मानसी नाईकने एक कविता पोस्ट केली आहे. त्यात तिने देव आणि आयुष्याबद्दल लिहिले आहे. मानसी नाईक ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते.
नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने तिच्या एका पारंपारिक फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. या कॅप्शनमध्ये एक कविता पाहायला मिळत आहे. या कवितेतून तिने तिचे मन मोकळं केल्याचे स्पष्ट होत आहे. याबरोबर तिने तिच्या चाहत्यांना सुप्रभात असेही म्हटले आहे.
मानसी नाईकने शेअर केलेल्या या काव्यात्मक पोस्टवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मानसी नाईक घटस्फोट घेणार असल्याचे बोललं जात आहे. मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न 19 जानेवारी 2021 ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण आता दोघांनीही इन्स्टाग्रामवरून त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्याही नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
COMMENTS