मुंबई : ’वाट बघतोय रिक्षावाला’, ’बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरे...
मुंबई : ’वाट बघतोय रिक्षावाला’, ’बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमधून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा पती प्रदीप खरेरा यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आले आहे. दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. मानसीने एका मुलाखतीत घटस्फोटासाठी अर्ज दिल्याचे कबुल केले आहे. मानसी आणि प्रदीप यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. इतकेच नाही तर त्यांनी एकमेकांबरोबरचे फोटोदेखील डिलिट केले होते. त्यानंतर त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर आता मानसीने पती प्रदीप खरेरापासून वेगळे झाल्याच्या चर्चांची पुष्टी दिली आहे. एका मुलाखतीत मानसीने पहिल्यांदाच घटस्फोटाच्या चर्चांवर मौन सोडले आहे. घटस्फोटाबद्दल सुरू असलेल्या चर्चा खर्या आहेत. मी खोटे बोलणार नाही. मी घटस्फोटासाठी अर्ज दिला आहे आणि यासंबंधी प्रक्रियेला सुरुवातही झाली आहे. मी आता या क्षणाला खूप दुःखी आहे. इतकेच नाही तर आता या लग्नाच्या नात्यातून वेगळे होण्याची वेळ आली आहे. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल मला कायम आदर आहे, असेही ती म्हणाली आहे. घटस्फोटाचे वृत्त समोर आल्यानंतर प्रदीपने त्याच्या सोशल मीडियावर एक शायरी शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टचा संदर्भ त्याच्या खासगी आयुष्याशी जोडला जात आहे. दरम्यान त्याची ही स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र अद्याप त्याने यावर काहीही स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. प्रदीप खरेराने शेअर केलेली शायरी रो रहाँ हू एक मुद्दत से, इश्क जो हो गया था शिद्दत से, तजुर्बा है तभी तो कहं रहा हूँ, मौत अच्छी है इस मोहोब्बत से!!
COMMENTS