जितो अहमदनगरच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात अहमदनगर | नगर सह्याद्री जितो अहमदनगरचे काम देशात आदर्शवत असल्याचे प्...
जितो अहमदनगरच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
अहमदनगर | नगर सह्याद्री
जितो अहमदनगरचे काम देशात आदर्शवत असल्याचे प्रतिपादन जितो अपेसचे अध्यक्ष अभयकुमार श्रीश्रीमाळ यांनी केले.
जैन इंटरनॅशल ट्रेड आर्गनायझेशन (जितो)च्या अहमदनगर शाखेच्या चेअरमनपदी जवाहर मुथा, सेक्रेटरीपदी आलोक मुनोत, व्हाईस चेअरमनपदी सुरेश कांकरिया, खजिनदारपदी सौरभ भंडारी, संचालकपदी तुषार कर्नावट व संजय गुगळे यांची निवड झाली आहे. लेडीज विंगच्या चेअरमनपदी मेघना मुनोत, सेक्रेटरीपदी शर्मिला गुगळे तर युथ विंगच्या चेअरमनपदी गौतम मुथा, सेक्रेटरीपदी खुशबु मुनोत तर व्हाईस चेअरमनपदी कुशल मुनोत, पुनित भंडारी यांची निवड झाली आहे. नूतन पदाधिकारी व कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. जितो अहमदनगर संघटनेत १५ चीफ पेट्रॉन, १५ पेट्रॉन तर लेडीज विंग व युथ विंगचे मिळून २० नवीन सदस्यांचे पीन देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी जितो अपेसचे अध्यक्ष अभयकुमार श्रीश्रीमाळ, माजी उपाध्यक्ष विजय भंडारी, उपाध्यक्ष कांतीलाल ओसवाल, सेक्रेटरी संजय लोढा, जितो अहमदनगरचे संस्थापक चेअरमन गौतम मुनोत, जितो झोन चेअरमन अजित सेटिया, पुणे चॅप्टरचे चेअरमन राजेशकुमार साकला, पंकज कर्नावट, ओदश खिंवसरा, जितो अहमदनगरचे मावळते चेअरमन अमित मुथा, प्रितेश दुगड आदी उपस्थित होते.
अभयकुमार श्रीश्रीमाळ म्हणाले की, जितो संघटना भारतासह २६ देशांत कार्यरत असून भारतात ६८ चॅप्टर कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम, आरोग्यसंपन्न समाजाची निर्मिती जितोचे मूळ उद्दीष्ट आहे. समाजाच्या सक्षमीकरणासाठी जितो अहमदनगरने मागील साडेचार वर्षात नगरमध्ये भरीव काम केले आहे. महाट्रेड फेअरसह अनेक चांगले उपक्रम राबवून नगरच्या टिमने संघटना घराघरात पोहचवली आहे. जितो अहमदनगरचे हे काम देशात आदर्शवत असून नवीन कार्यकारिणीही हे काम आणखी पुढे नेईल, असा विश्वास आहे. जवाहर मुथा म्हणाले की, जितो अहमदनगरचे संस्थापक गौतम मुनोत व मावळते चेअरमन अमित मुथा यांनी अतिशय धडाडीने काम करून ठसा उमटविला आहे. सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी नानाविध उपक्रम राबविण्यात आले आहे.
त्यामुळे जितो संघटनेबद्दल एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला आहे. येत्या काळात नगरमध्ये जितो सदस्य संख्या वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येतील. मावळते चेअरमन अमित मुथा यांनी सांगितले की, अडीच वर्ष सेक्रेटरी आणि दोन वर्ष अध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांचे अतिशय मोलाचे सहकार्य ्रलाभले. त्यामुळेच जितोने साडेचार वर्षात नगरमध्ये मोठा नावलौकिक मिळवला. महाट्रेड फेअरमधून जितो अहमदनगरने नगरच्या उद्योग, व्यवसायाला मोठी चालना मिळवून दिली. महाराष्ट्रात या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक झाले. जितोचा मूळ उद्देश हा प्रत्येकाला एक चांगले व्यासपीठ मिळवून देत मोठी भरारी घेण्यास प्रोत्साहन देणे आहे. यातूनच आम्ही युवा पिढीसाठी जॉब फेअर, तज्ज्ञांचे मार्गदर्शन असलेला युथॉन कार्यक्रम, जेएफसीमार्फत आताच्या काळाची गरज ओळखून ट्रेनिंग प्रोग्राम राबविले. याशिवाय शिक्षण, नोकरी, व्यवसाय या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ जितोने समाजाला मिळवून दिला. त्यामुळे अनेकांना योग्य दिशा मिळाली. क्रीडा क्षेत्रातही भरीव योगदान देता आले. कोविड काळातही समाजासाठी चांगले उपक्रम राबवून आरोग्यमंत्र दिला होता. कार्यक्रमास जितोचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सेक्रेटरी आलोक मुनोत यांनी आभार मानले.
COMMENTS